- Advertisement -
एअरपोर्टवर सरकारी चाचणी उपलब्ध करून न देता खाजगी लॅब्ससाठी पैसा मिळवून देण्यासाठी सरकारने खाजगी चाचणीच्या प्रकारावर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान टीका केली. त्यावेळी पैसे कमावण्यासाठी सरकारमध्ये काय काय प्रकार सुरू आहेत यावरही त्यांनी लक्ष्य वेधले. खाजगी लॅब्ससाठी नवीन धंदा शोधला असून महिन्याला १५ कोटींचे उत्पन्न गोळा करण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी यावेळी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. एअरपोर्टवर होणाऱ्या चाचण्यांमध्ये सरासरी १ टक्का रूग्ण पॉझिटीव्ह येतात. त्यापेक्षा अधिक टेस्ट पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण हे विधिमंडळ अधिवेशनात असल्याचेही त्यांनी लक्षात आणून दिले होते.
- Advertisement -