बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’च्या घवघवीत यशानंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती नेटफिलक्सवरील स्पाय थ्रिलर चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. आलिया तिच्या नव्या पाश्च्यात्य चित्रपटात अभिनेता गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्यासोबत काम करणार आहे.
नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर आलियाच्या कास्टिंगची घोषणा केली आहे. आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या ‘हार्ट ऑफ स्टोन’ या आंतरराष्ट्रीय स्पाय थ्रिलरमध्ये काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.
View this post on Instagram
ग्रेग रुका आणि अॅलिसन श्रोडर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन टॉम हार्पर करणार आहेत. हा चित्रपट रेचेल स्टोन या गुप्तचर कार्यकर्त्याभोवती फिरतो. स्कायडान्सचे डेव्हिड एलिसन, डाना गोल्डबर्ग आणि डॉन ग्रेंजर, मॉकिंगबर्डचे बोनी कर्टिस आणि ज्युली लिन आणि पायलट वेव्हचे गॅडोट आणि जॅरोन वारसानो यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली आहे. मात्र या चित्रपटातील आलियाची भूमिका अजून ही गुलदस्त्यात आहे.
दरम्यान आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला करतोय. या चित्रपटाने आत्तापर्यंत 100 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. जगभरातील प्रेक्षकांची मनं या चित्रपटाने जिंकली आहेत. आलिया या चित्रपटात मुख्य भुमिकेत असून गंगूबाई या महिलेची व्यक्तीरेखा तिने साकारली आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं सर्व स्तरातून विशेष कौतुक केलं जात आहे.