इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) हे 15 वे पर्व सध्या सुरू आहेत. या 15 व्या पर्वात आयपीएलच्या नियमांपासून ते प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांना मैदानात बसून सामना पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयनं बायो बबलची व्यवस्था केली आहे. या बायो बबलमध्ये कुणालाही प्रवेश मिळत नाही. खेळाडूंनाही बायो बबलमध्ये जाण्यासाठी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण कारावा लागतो. पूर्ण सुरक्षा घेत आयपीएलचा रण संग्राम सुरु आहे. पण सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आले आहे. खेळाडूंसाठी सुरक्षित असलेले बायो बबल पोलिसांनीच तोडलं. त्यामुळं पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारुच्या नशेत खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह पोलिसांना आवरला नाही, ते थेट बायो बबल तोडून फोटो काढण्यासाठी गेले. या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा कोरोना महामारीमुळं मुंबई आणि पुण्यातील मैदानावर आयपीएलमधील लीग सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार, डी. वाय. पाटील मैदानावर सोमवारी गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना झाला. या सामन्यावेळी खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह पोलिसांना आवरला नाही. त्यामुळं फोटोसाठी पोलिसांनी बायो बबल तोडलं.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या बायो बबल 2 पोलिसांनी तोडलं आहे. हे दोन्ही पोलीस दारुच्या नशेत होते. या पोलिसांनी खेळाडूंसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी थेट बायो बबल मोडत खेळाडूंसोबत फोटो घेण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल वर्दीमध्ये होते.
रवींद्र मेट (33) आणि नरेंद्र नागपुरे (36) असे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबलची नावे आहेत. हे दोन्ही पोलीस डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये सुरक्षेसाठी तैनात होते. यावेळी या पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करत खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. ड्युटीवर असताना हे दोन्ही पोलीस दारुच्या नशेत होते. त्यामुळं या पोलिसांवर कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
हेही वाचा – टेस्ट मालिका सोडून IPL खेळाणाऱ्या खेळाडूंना संघात घेणार नाही?, आफ्रिकेच्या कॅप्टनने दिला सूचक इशारा