घरताज्या घडामोडीसत्तेत आल्यानंतर ५०० रुपयांत सिलिंडर, मोफत वीज देऊ; गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचं...

सत्तेत आल्यानंतर ५०० रुपयांत सिलिंडर, मोफत वीज देऊ; गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचं आश्वासन

Subscribe

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून लोकांना आश्वासनं दिलं जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये लोकांना सभेत संबोधित केले. त्यानंतर लोकांना आश्वासन देत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. याशिवाय 3000 इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडण्याची आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणाही काँग्रेस नेत्याने केली.

- Advertisement -

काँग्रेसची सत्ता येताच 1000 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारने बंद केलेल्या शाळा पुन्हा चालू करण्याचे अश्वासनही दिले.

- Advertisement -

गुजरात ड्रग्ज सेंटर बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. आंदोलन करण्यापूर्वी ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागते. असं गुजरात हे राज्य आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भाजपसारख्या दोन-तीन मित्रांसाठी नव्हे तर गुजरातच्या जनतेसाठी काम करू. हा आमचा संकल्प आहे आणि गुजरातची जनता काँग्रेसला विजयी करेल.


हेही वाचा : सदोष प्रकल्प अहवालांमुळे रस्ते अपघातात वाढ, नितीन गडकरींची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -