मेष : आर्थिक मदत मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. स्पर्धा जिंकता येईल. नोकरीत फायदेशीर बदल करता येईल.
वृषभ : केस जिंकता येईल. नवीन ओळख अधिक वाढेल. कल्पनाशक्ती वाढेल. मान-सन्मानाचा योग येईल.
मिथुन : तणाव कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. शेजारी मदत करतील. वरिष्ठांना सोडून बोलू नका.
कर्क : सकाळी महत्त्वाचे काम करा. बोलण्यातून तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. प्रभाव टिकून राहील.
सिंह : जवळच्या लोकांची मर्जी कशी राखावी यावर चर्चा करता येईल. प्रतिष्ठेचा बडेजाव न करता कामे करा.
कन्या : कोर्टाचे कामात यश मिळेल. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवा. स्पर्धा जिंकाल. ओळख वाढेल.
तूळ : मनावरील दडपण कमी करता येईल. नोकरीत काम वाढेल. महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. कल्पनाशक्ती वाढेल.
वृश्चिक : सकाळी महत्त्वाचे काम करा. संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. आळस करू नका. खर्च जरुरीपुरता करा.
धनु : विचारांना चालना मिळेल. सकाळी निर्माण झालेला प्रश्न संध्याकाळी सोडवता येईल. तणाव कमी होईल.
मकर : राग कमी ठेवा. वाहन जपून चालवा. प्रयत्नाने कोणतेही कठीण काम मार्गी लावता येईल.
कुंभ : उत्साह वाढवणारी घटना घडेल. दादागिरी नको. नम्रपणे बोला प्रभाव पडेल. मैत्री होईल.
मीन : धंद्यात कामे मिळवता येईल. समोरच्या व्यक्तीचा मुद्दा समजून घ्या. स्पर्धा जिंकता येईल. गोड बोला.