घरताज्या घडामोडीMumbai Coastal Road : संबंध परवानग्या रखडवण्यापुरताच...; कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर...

Mumbai Coastal Road : संबंध परवानग्या रखडवण्यापुरताच…; कोस्टल रोडवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Subscribe

मुंबईतील वाहतुककोंडी सोडवण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी कोस्टल रोडची बांधणी करण्यात आली. मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. परंतू, या प्रकल्पाचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई : मुंबईतील वाहतुककोंडी सोडवण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी कोस्टल रोडची बांधणी करण्यात आली. मुंबई कोस्टल रोडची एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. परंतू, या प्रकल्पाचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या श्रेयवादावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा संबंध हा केवळ दोन वर्षांसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या रखडवण्या इतकाच आहे, असे म्हणत भाजपवर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला. (Mumbai Coastal Road Projects Shiv Sena Thackeray Group Leader Aaditya Thackeray Slams BJP)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर कोस्टल रोडच्या उद्धाटनाचे फोटो शेअर करत भाजपावर टीका केली आहे. “भाजपने कोस्टल रोडचे श्रेय घेतले हे हास्यास्पद आहे. भाजपचा कोस्टल रोडशी काहीही संबंध नाही. भाजपचा संबंध हा केवळ दोन वर्षांसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या रखडवण्या इतकाच आहे. कोस्टल रोडची घोषणा आणि त्या प्रकल्पाच्या कामाची सुरूवात उद्धव ठाकरे यांनी केली. भाजप नेहमी स्वत:हून न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यास उत्सुक असते”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

- Advertisement -

“कोस्टल रोड सुरू करण्यात प्रचंड उशीर झाला असून, जितका सुरू केला तोही अर्धवटच सुरू केला. पण जर महाविकास आघाडी सरकारमध्ये असती तर, आम्ही खर्चात वाढ न करता डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडचे संपूर्ण काम पूर्ण केले असते. आता गतवर्षी पूर्ण होणारे काम 2024 च्या मध्यापर्यंत अर्धेही पूर्ण झालेले नाही. प्रत्येक महिन्याला अंतिम मुदत पुढे ढकलली जाते”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

दरम्यान, “भाजप श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू शकतो, पण हे घडवून आणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे मुंबईकरांना माहीत आहे”, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राज्यातील 15 पैकी 13 जागांवर शिंदे – ठाकरे अशी थेट लढत; जनतेचा कौल कोणाला?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -