घरठाणेराष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

Subscribe

महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणार्या गुजरातचा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला.

ठाणे : महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठमोठे प्रकल्प परस्पर गुजरातला पळवणार्या गुजरातचा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा जप्त केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. (Attempt by NCP Youth Congress to burn effigy of Gujarat Chief Minister)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिंदे-फडणवीस आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, या प्रसंगी गुजरात सरकारची निर्भत्सना प्रकल्प चोर अशी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्‍या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा पुतळा जाळण्यात आला.

दरम्यान, उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला” हे धोरण शिदे-फडणवीस सरकारने आखले असून त्यास मोदींचा पाठिंबा आहे. या पुढे जर असे प्रकल्प पळविले तर या सरकारला जनता पळवून लावेल, असा इशारा विक्रम खामकर यांनी दिला.

- Advertisement -

या आंदोलनात प्रफुल कांबळे विद्यार्थि अध्यक्ष, गजानन चौधरी, अभिषेक पुसालकर, संतोष मोरे, श्रीकांत भोईर, संदीप येताल, आकाश पगारे, सिदिक शेख, जितेश पाटील, संकेत पाटील, सुनील निषाद, अमित लगड, अमित खरात, अमोल गायखे, सोनू,सकपाळ, फिरोज पठाण, दिनेश सोनकांबळे, महेश सिंह, भावेश धोत्रे, महेश यादव, साई भोगवे, दौलत समुखे, भारत पवार आणि विषांत गायकवाड सहभागी झाले होते.


हेही वाचा – अकोल्यात शिवसेनेच्या शहर उपप्रमुखावर सशस्त्र हल्ला; सर्व आरोपी फरार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -