घरक्राइमअकोल्यात शिवसेनेच्या शहर उपप्रमुखावर सशस्त्र हल्ला; सर्व आरोपी फरार

अकोल्यात शिवसेनेच्या शहर उपप्रमुखावर सशस्त्र हल्ला; सर्व आरोपी फरार

Subscribe

आकोल्यात शिवसेनेचे शहर उपप्रमूखावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादाय माहिती समोर येत आहे. विशाल रमेश कपले (33) असे त्याचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. विशाल कपले यांच्यावर तीन ते चार हल्ले खोरांनी प्राणघात हल्ला केल्याचे समजते.

आकोल्यात शिवसेनेचे शहर उपप्रमूखावर सशस्त्र हल्ला झाल्याची धक्कादाय माहिती समोर येत आहे. विशाल रमेश कपले (33) असे त्याचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. विशाल कपले यांच्यावर तीन ते चार हल्ले खोरांनी सशस्त्र हल्ला केल्याचे समजते. हा हल्ला कोणी व का केला, याचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या सोधासाठी पोलिसांनी तपास पथके स्थापन केली आहे. येथील सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा माग काढला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उपशहरप्रमुख विशाल रमेश कपले काही कामानिमित्त घराबाहेर पडले होते. विशाल कपले हे रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ परिसरातील कोरेडे दवाखान्याच्या गल्लीत उभे होते. त्यावेळी तिथे तीन ते चार हल्लेखोर आले आणि त्यांनी कपले यांच्यावर धार-धार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात कपले हे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या हल्ल्यानंतर आरोपींनी तिकडून पळ काढला. या हल्ल्यांची पोलिसांना माहिती दिली असता, त्यांनी अधिक तपासाला सुरूवात केली आहे. दरम्यान, शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असलेल्या जठारपेठ चौकात ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर तेथील नागरिकांनी विशाल कपले यांना तातडीने रुग्णालयात दाखळ केले. त्यांचावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर रामदास पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! मोरबी पूल दुर्घटनेत भाजपा खासदार मोहन कुंदारियांच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -