घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत आज ९३३ रुग्ण आढळले; ३४ मृत्यू

Corona Live Update: मुंबईत आज ९३३ रुग्ण आढळले; ३४ मृत्यू

Subscribe

मुंबईत आज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज तब्बल ९३३ रुग्णांची मुंबईत नोंद झाली. तर आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisement -

पावसाळा तोंडावर आल्याने राज्य सरकारने छत्री, रेनकोटचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट विक्रेत्यांना दिलासा मिळाला असून त्यांना आपले दुकान सुरू करता येणार आहे. राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात राज्य सरकारने आज सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी केली. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेवून छत्री,रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश केला आहे. हा आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक २ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.


पंढरपूरची वारी यंदा होणार की नाही, यासाठी ४ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पंढरपूर विठ्ठल मंदीर समितीची बैठक होणार असल्याची माहिती जाहीर झाली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.

- Advertisement -

राज्यात लॉकडाऊन ४०मध्ये नक्की कोणत्या प्रकारे नियम आणि शिथिलता देता येईल, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक. या बैठकीत राज्यातल्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला गेला. आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, जयंत पाटील देखील या बैठकीला उपस्थित.


महाराष्ट्रातल्या एकूण १ हजार ६१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यामध्ये ११२ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातल्या १७४ पोलिसांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं असून ९ पोलिसांचा मात्र कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.


जागतिक बँकेकडून भारताच्या कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी, त्यातल्या उपाययोजनांसाठी १ अब्ज डॉलरच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.


आषाढी वारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीमध्ये ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी सोहळ्यासाठी पालखी निघणार का? याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची आज तिसरी पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये कोणत्या समाज घटकांसाठी कोणत्या योजनांची घोषणा होणार? याविषयी उत्सुकता आहे. आत्तापर्यंत घेतलेल्या दोन पत्रकार परिषदांमध्ये केंद्र सरकारने लघु-कुटीरोद्योग, स्थलांतरीत मजूर, फेरीवाले, शेतकरी या समाजघटकांसाठी काही घोषणा केल्या आहेत.


गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत सर्वाधित १७५४ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिलं आहे.


मालदीवमध्ये अडकलेल्या ७०० भारतीयांना परत आणण्यासाठी आयएनएस जलसा मालदीव्ज पोर्टवर पोहोचली. प्रवाशांना परत आणण्यापूर्वीची प्रक्रिया सुरू.


राज्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता २७ हजार ५२४पर्यंत पोहोचली आहे. तर त्यातल्या ६ हजार ५९ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. एकूण मृतांचा आकडा आता १ हजारांच्या वर गेला असून ही संख्या १ हजार १९ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -