घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत १३५० नवे रूग्ण

Corona Live Update: मुंबईत १३५० नवे रूग्ण

Subscribe

मुंबईत आज दिवसभरात १३५० कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर ८३४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मुंबई कोरोनाबाधितांची संख्या १,४०,८८२ वर पोहचली आहे.


देशभरात कोरोनाच्या आकड्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील आकडे चितांजनक पद्धतीने वाढत आहेत. आज राज्यात १४,७१८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,३३,५६८ झाली आहे. राज्यात आज एकूण १,७८,२३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. झाली असून, मृतांची संख्या २३ हंजार ४४४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

आता कोरोनाची चाचणी मशीनशिवाय

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या एफडीएने बुधवारी पहिल्या रॅपिड कोरोनाव्हायरस विषाणूच्या स्क्रीनिंग किटला मान्यता दिली. विशेष म्हणजे या किटच्या मदतीने आपल्याला निकाल जाणून घेण्यासाठी कोणत्याही विशेष संगणक उपकरणांची आवश्यकता नसणार आहे. हे किट अ‍ॅबॉट लॅबोरेटरीजने विकसित केले आहे. क्रेडिट कार्डसारख्या सेल्फ-टेस्ट किट फ्लू, घसा आणि इतर संसर्गाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

लॉकडाऊनदरम्यान कारवाईचा बडगा; पुण्यात वाहनचालकांकडून ४८ लाखाचा दंड वसूल

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात काही महत्त्वाचे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्चपासून करण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू होणार

राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे सप्टेंबरपासून राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.  (सविस्तर वाचा)


Corona Virus : धोक्याची घंटा, भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे!

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना भारतामध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या दिवसाला तब्बल ५० ते ६० हजारांच्या घरात वाढते आहे. गुरुवारी देशाच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये ७५ हजार ७६० रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत २४ तासांत नव्याने भर पडलेली ही सर्वाधित रुग्णसंख्या आहे. भारतात Lockdown काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना रुग्णसंख्या मात्र मोठ्या संख्येने वाढत असताना आता भारताच्या काळजीत अजून भर पडली आहे. कारण भारतानं आता कोरोनाच्या Active पेशंटच्या संख्येमध्ये (Active Corona Patients in India) ब्राझीलला देखील मागे टाकलं आहे. आत्तापर्यंत या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर तर ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, गुरुवारी भर पडलेल्या नव्या रुग्णसंख्येनंतर भारतानं ब्राझीलला मागे टाकलं आहे. (सविस्तर वाचा)


केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांना कोरोनाची लागण झाली आहे.


देशात बाधितांचा आकडा ३३ लाखांपार!

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सातत्याने वाढतांना दिसत आहे. दररोज जगातील सर्वात नवीन कोरोनाचे रुग्ण भारतात आढळले येत आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ३३ लाखांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे ७५ हजार ७६० नवे रूग्ण आढळले असून १ हजार २३ जणांचा जीव कोरोनामुळे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २९५ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख २२ हजार रुग्ण रिकव्हर झाले असून १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -