घरमुंबईदिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ३४ कोटींच्या खंडणीसाठी धमकी

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ३४ कोटींच्या खंडणीसाठी धमकी

Subscribe

खेड येथून 34 वर्षांच्या खंडणीखोराला अटक व पोलीस कोठडी

मराठी अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी गेल्या काही दिवसांपासून अंडरवर्ल्डकडून धमकीचे मेसेज येत असल्याची तक्रार मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात केली आहे. या तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे धमकीचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर यांच्या मोबाईल क्रमांकावरून येत होते. तसेच हे मेसेज अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या टोळीकडून येत असल्याची माहिती समोर येत आहे. अबू सालेम हा सध्या तळोजा तुरुंगात असून या धमकीप्रकरणी अबू सालेमकडे तुरुंगात जाऊन चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

दरम्यान, या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपविला होता. हा तपास हाती येताच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या पथकातील सचिन कदम, अरविंद पवार, राजू सुर्वे, विश्वास पाटील, सचिन पाटील, अनिल रणखांबे, सचिन दळवी, नीलेश कंद, स्वप्नील शिंदे, रोहन सुर्वे, संदीप पाटील, नवसारे यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान ते सर्व कॉल कल्याण आणि रत्नागिरीच्या खेड येथून आल्याचे उघडकीस आले, त्यानंतर तिथे संबंधित पथकाला पाठविण्यात आले होते. या व्यक्तीने त्याचा मोबाईल सतत बंद ठेवला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले होते. तरीही तांत्रिक माहितीवरून या पथकाने खेड परिसरातून मिलिंद तुळसनकर याला शिताफीने ताब्यात घेतले.

- Advertisement -

चौकशीत त्यानेच महेश मांजरेकर यांना खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. तपासात मिलिंद हा दिवा येथील ट्रॉन्सफॉर्मरजवळील मुंब्रादेवी कॉलनी, विष्णू दादा अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक 104 मध्ये राहतो. लॉकडाऊनमध्ये काहीच काम नसल्याने त्याला पैशांची गरज होती. त्याने यु ट्यूबवर गँगस्टर आबू सालेमचे काही व्हिडिओ पाहिले होते. या व्हिडिओवरून त्याने गुन्हेगारी कार्यप्रणालीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने एका वेबसाईटवरून महेश मांजरेकर यांना मोबाईल क्रमांक मिळविला. हा क्रमांक मिळताच त्याने त्यांना खंडणीसाठी धमकी देण्यास सुरुवात केली होती. खंडणीसाठी त्याने त्यांना कॉलसह काही मॅसेज पाठविले होते. अटकेच्या भीतीने तो कल्याण येथून खेड येथे पळून गेला होता. तसेच फोन बंद करून ठेवला होता. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईलसह दोन सिमकार्ड पोलिसांनी हस्तगत केली आहेत. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवार 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा आबू सालेमशी काहीही संबंध नाही, त्याने महेश मांजरेकर यांच्यासह इतर काही बॉलीवूडच्या कलाकारांना धमकी दिली आहे का याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.

हेही वाचा –

‘रिया माझ्या मुलाला विष देत होती, तिनेच हत्या केली’; सुशांतच्या वडिलांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -