घरताज्या घडामोडीदीपिका पदुकोणच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

दीपिका पदुकोणच्या मॅनेजरचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Subscribe

चार दिवसांपासून आहे गायब!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वातले ड्रग्ज प्रकरण समोर आले. या प्रकरणात अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत. यात अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्यावरही ड्रग्ज पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी करिश्माने मुंबईच्या विशेष कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून करिश्मा गायब असून, तिच्याविषयी कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला गैरहजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

करिश्माच्या घरात ड्रग्जचा साठा
मंगळवारी (27 ऑक्टोबर) दिवसभर तिच्या घरी एनसीबीची कारवाई सुरू होती. घरात ड्रग्ज सापडल्यानंतर करिश्मा प्रकाश हिच्यावर तत्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला. एनसीबीचे अधिकारी करिश्माच्या घरी गेले तेव्हा ती घरात नव्हती. यानंतर अधिकार्‍यांनी करिश्माच्या कुटुंबीयांकडे चौकशीसाठीचे समन्स देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे समन्स स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे एनसीबीच्या अधिकार्‍यांनी हे समन्स करिश्मा प्रकाशच्या घराच्या दारावर चिकटवले. यानंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांकडून तिचा शोध सुरु आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू असताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोण, रकुल प्रीत, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर अशा अनेक बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -