घरलाईफस्टाईलजाणून घ्या; किडनी निकामी होण्याची ही असू शकतात लक्षणे

जाणून घ्या; किडनी निकामी होण्याची ही असू शकतात लक्षणे

Subscribe

शरीरातील प्रत्येक समस्येकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने किडनीच्या बाबतीत तर सावधगिरी बाळगणे आवश्यकच आहे. कारण किडनीच्या आजाराचे सुरुवातीस लक्षात आले नाही तर ते प्राणघातक होऊ शकते. आकडेवारीत सिद्ध झाले आहे की या किडनीच्या किंवा मूत्रपिंडाच्या आजाराने सर्वात अधिक कोणी ग्रस्त आहे तर त्या बायका आहेत. म्हणून त्यांना अधिक जागरूक आणि सावध राहण्याची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊ या त्या संकेतांबद्दल, जे आपले शरीर आपल्याला किडनीचा आजार होण्याचे दर्शवतात.

  • प्रत्येक वेळी कमकुवत पण जाणवणं. जास्त थकवा जाणवणं.
  • शरीरात ऊर्जेचा अभाव. खरं तर जेव्हा मूत्रपिंड किंवा किडनी व्यवस्थितरीत्या काम करत नाही, तेव्हा माणसाचे शरीर या प्रकारचे संकेत देतात, ज्यांना वेळेत ओळखणे आवश्यक आहे.
  • वारंवार लघवी लागणे.
  • रात्री बऱ्याच वेळा लघवीला जाणं. जर आपल्याला देखील अश्याच प्रकारांची तक्रार असल्यास त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • जर आपल्याला एकाएकी आपली त्वचा रुक्ष वाटत असल्यास. त्वचेमध्ये जळजळ आणि खाज येत असल्यास याला सहजच घेऊ नका.
  • शरीराचे वजन एकाएकी वाढणे.
  • शरीरावर सूज येणं. हे आपली किडनी योग्य प्रकारे काम न करण्याचे संकेत देखील असू शकतात. अश्या परिस्थितीत आपल्याला त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उन्हाळ्यात देखील जास्त थंडी वाजते. झोप येत नाही. अधिक तहान लागणे.

हेही वाचा –

ट्रम्पला टक्कर देणाऱ्या बिडेनच्या मुलाने Porn Site वर उडवले तब्बल १५ लाख रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -