घरताज्या घडामोडीविरारमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

विरारमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

पालघर गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये दोनशे कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट हॅकिंग प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याचा आणि या प्रकरणाचा संबंध असल्याची चर्चा आहे.

पालघर गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांने गोळीबार केला. सिद्धवा जायभाये दोनशे कोटी रुपायांच्या कॉर्पोरेट हॅकिंग प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्यावर शनिवारी रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे बाईकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात सिद्धवा जायभाये सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये कारने पालघरवरुन नालासोपारा येथील आपल्या राहत्या घरी जात होत्या. विरार फाट्यावरील ‘बर्गर किंग’ येथे पार्सल घेण्यासाठी थांबल्या होत्या. पार्सल घेऊन बाहेर येताच त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी सिद्धवा जायभाये यांच्या कारच्या बोनेट लागल्यामुळे त्या या हल्ल्यातून बचावल्या. अज्ञात हल्लेखोरांनी आपला चेहरा झाकला होता

- Advertisement -

हेही वाचा – विरारमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

दरम्यान, सिद्धवा जायभाये यांच्यासोबत दोन पोलिस सहकारी देखील होते. अज्ञात हल्लेखोर काळ्या रंगाच्या पल्सरवरुन आला होता. त्यावेळी त्याने जॅकेट घातले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ज्या ठीकाणी गोळीबार करण्यात आला, त्या ठीकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये बँक खात्यातून २०० कोटी चोरणाऱ्या बड्या रॅकेटचा त्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. सिद्धवा जायभाये यांच्यावरील हल्ल्याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का? याचा देखील तपास करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -