घरताज्या घडामोडीएकाच कुटुंबातील ५ जणांना करोनाची लागण

एकाच कुटुंबातील ५ जणांना करोनाची लागण

Subscribe

एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना व्हायरसची लागण झाल्याची घटना केरळमधील तिरूवनंतपुरम येथे झाल्याचे समोर झाले आहे. आता करोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा ३९ वर झालेला आहे. केरळमधील करोनाची लागण झालेल कुटुंब इटलीहून आले होते. पण त्यांनी एअरपोर्टवर ही माहिती दिली नाही. तसेच नजीकच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये याची माहिती दिली नाही. याच पार्श्वभूमीवर अरूणाचल प्रदेश सरकारने परदेशातून येणाऱ्यांना राज्यात येण्यासाठी मज्जाव केला आहे. जगभरात आतापर्यंत १ लाख लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर ३ हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी होळी सणाच्या निमित्ताने सण साजरा करण्यासाठीही मज्जाव कऱण्यात आला आहे.

केरळमधील एक दाम्पत्या त्यांच्या २६ वर्षाच्या मुलासह भारतात परतले. परतीच्या प्रवासात ते काही नातेवाईकांच्या घरीही गेले होते. त्यापैकी ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. ह्या सगळ्यांना निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. हे दाम्पत्या ९० च्या दशकात केरळमध्ये गेले होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. तिरूवनंतपुरम येथील पथनमथिट्टा येथील लागण झालेले हे पाचही लोक आहेत. ज्या प्रवाशांनी डोहा ते कोची दरम्यान या कुटुंबासोबत कतार एअरवेजच्या फ्लाईटमधून प्रवास केला होता त्यांना सगळ्यांना आपली चाचणी करून घेण्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत केरळमध्ये करोना व्हायरची लागण झालेल्यांची संख्या ८ वर पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -