घरठाणेपतंगाच्या मांज्याने फ्लेमिंगो जखमी, उपचार सुरू

पतंगाच्या मांज्याने फ्लेमिंगो जखमी, उपचार सुरू

Subscribe

फ्लेमिंगोचा रक्तस्त्राव कमी करण्यासाठी त्या संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार सुरू केले. तसेच त्या पक्ष्याला सलाईनही लावण्यात आली. ही जखम पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांज्याने झाली असावी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पतंगाच्या मांज्याने पक्षी जखमी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत, त्यातच बुहदा अशाप्रकारे रविवारी दुपारी पंखाला जखम होऊन अतिरक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत एका फ्लेमिंगो (Flamingo) या पक्ष्याला वनविभागाने ठाण्यातील एसपीसीएमए या संस्थेच्या पशु- पक्ष्यांच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे. अशापद्धतीने पशु पक्षी जखमी अवस्थेत असेल तर त्यांची माहिती संस्था किंवा प्राणी किंवा पशुमित्रांना कळवा असे आवाहन पशु वैद्यकीय डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

रविवारची दुपारची वेळ होती. ठाणे ब्रम्हांड येथील एसपीसीएमए या संस्थेत वनविभागाचे काही मंडळी एका जखमी पक्ष्याला घेऊन दाखल झाले. त्या पक्ष्याच्या डाव्या पंखाला जखम झाल्याने रक्तस्त्राव होते. रक्त थांबत नसल्याने त्या जवळपास साडेतीन ते चार फुट उंच असलेला फ्लेमिंगो या पक्ष्याच्या डाव्या पंखाला कट झाले होते. हे पाहून तातडीने त्या फ्लेमिंगोचा रक्तस्त्राव कमी करण्यासाठी त्या संस्थेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार सुरू केले. तसेच त्या पक्ष्याला सलाईनही लावण्यात आली. ही जखम पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांज्याने झाली असावी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

‘सद्यस्थितीत त्या पक्ष्याची प्रकृती स्थिर असून आता रक्त स्त्रावही थांबले आहे. तो उपचाराला प्रतिसाद देत असून जखम भरल्यावर त्याला तातडीने मुक्तसंचार करण्यासाठी सोडण्यात येईल. तर त्याच्या योग्य उपचार सुरू असल्याने धोका टळला आहे. तसेच हा फ्लेमिंगो नर जाती तसेच तो अंदाजे दोन वर्षांचा असून तो जखमी अवस्थेत मुलुंड ते भांडुप येथील खाडी परीसरात आढळून आला आहे’. – डॉ सुहास राणे, पशुवैद्यकीय, एसपीसीएसए, ठाणे


हेही वाचा – ठाणे: खाडीच्या चिखलात अडकली कार; सहा जणांना बाहेर काढण्यात यश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -