घरताज्या घडामोडीशेकापाचे माजी आ.विवेकानंद पाटील यांना ईडीचा दुसरा दणका

शेकापाचे माजी आ.विवेकानंद पाटील यांना ईडीचा दुसरा दणका

Subscribe

कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्ससह आतापर्यंत ३८६ कोटींची मालमत्ता जप्त

नवी मुंबई-:
कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळया (Karnala Urban Cooperative Bank Scam) प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद पाटील यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीकडून पाटील यांच्या १५२ कोटींच्या मालेमत्तेवर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. तसेच या मालमत्तेमध्ये पाटील यांच्या कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स कॉर्पोरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मालमत्तेचा देखील समावेश करण्यत आला आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात एकूण ३८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (386 crore seized) करण्यात आली आहे.


शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळा आमदार राहिलेले आणि रायगड जिल्ह्यातील प्रसिध्द कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने या बँकेचे ऑडिट केले.त्यावेळी कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले होते. तेव्हापासून चौकशी आणि ईडीचा सिसेमीरा पाटील यांच्या मागे लागला आहे.
ईडीने (गुरुवार १२ ऑक्टोंबर रोजी) कारवाई करत बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष विवेकानंद पाटील, त्यांचे नातेवाईक आणि कर्नाळा महिला रेडीमेड गारमेंट्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या मालकीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. जमीन, बंगला, निवासी संकुल इत्यादींच्या स्वरूपात १५२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.एकूण ३८६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

- Advertisement -
  • यापुर्वी ईडीने (सन २०२१ मध्ये)विवेकानंद पाटलांची तब्बल २३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीमध्ये कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकॅडमी आणि अन्य ठिकाणच्या जमिनींचाही समावेश आहे.
  • १० वर्षे पनवेल पंचायत समितीचा सभापती आणि सन १९९५, १९९९, २००४, २००९ असे चार वेळा विधानसभेवर निवडून येऊन २० वर्षे आमदार म्हणून पाटील यांनी काम केले आहे.
  • १३ जुलै २०२३ रोजी वय ६९ वर्षे असून प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे ट्विट करुन राजकारणातून संन्यास घेतल्याचे सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -