घरताज्या घडामोडीभाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत द्या, रुपाली चाकणकरांचे...

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत द्या, रुपाली चाकणकरांचे मोदींना पत्र

Subscribe

५० टक्के सवलत देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी

गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये १५ रुपयांनी वाढ झाल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राज्यात आंदोलन करण्यात येणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. खाद्यतेलांच्या किंमती ऐन दिवाळीत दिवाळीत वाढल्या. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेलांच्या किंमतींवर दिवाळी सणासाठी ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी या पत्रातून केली.

- Advertisement -

महागाईने उच्चांक गाठला असून ऐन दिवाळीत संक्रात ओढावली आहे. यासाठी दिवाळीच्या पाच दिवसात गॅस सिलेंडरच्या किंमती, खाद्य तेल आणि डाळींच्या किंमतीत ५० टक्के सवलत देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी असे रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणाऱ्या पत्राविषयी रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत, उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.  पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील महिलांनी दिलेली आर्त साद ऐकून आमची दिवाळी गोड करतील असा विश्वास यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमती थेट सातशेहून एक हजारांवर गेल्या.ऐन दिवाळीत महागाईचे संकट ओढावल्या महिला चिंतेत आल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गॅस सिलेंडरच्या दरांविरोधात राज्यातील महिला आंदोलन करणार आहेत.  त्याच्या मागण्या मान्य करुन गॅस सिलेंडर तसेच खाद्यतेल आणि डाळींच्या किंमतीत ५० टक्के सवलत द्यावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?


हेही वाचा – Bypoll 2021: पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात पोटनिवडणूकीचे अपडेट काय ? शिवसेनेचे दिल्लीकडे पाऊल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -