घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात गेल्या २४ तासांत ५,५३९ नव्या रुग्णांची वाढ, १८७ जणांचा...

Live Update: राज्यात गेल्या २४ तासांत ५,५३९ नव्या रुग्णांची वाढ, १८७ जणांचा मृत्यू

Subscribe
राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून १८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजार ८५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख ४१ हजार ७५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३३ हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला असून ६१ लाख ३० हजार १३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या २४ तासांत मुंबईत ३०९ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची आकडा ७ लाख ३६ हजार ८६२वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ लाख १४ हजार १६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

तामिळनाडूमधील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. २३ ऑगस्टपर्यंत तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन असणार आहे.

- Advertisement -

केरळमध्ये आज १९ हजार ९४८ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार ४८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले.


देशभरात आतापर्यंत ४९.५३ कोटी लसीकरण पारड पडले आहे. देशातील ३ कोटी १० लाख १५ हजार ८४४ रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट ९७.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज हिंगोली जिल्हयातील नरसी नामदेव या संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी बांधलेल्या मंदिराला भेट दिली व वंदन केले.


भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाचा सेमी फायनलमध्ये पराभव, अजरबैझानच्या कुस्तीपटूची पुनियावर मात, पुनियाकडून भारताला सुवर्ण पदकाची आशा होती.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नागपूरमध्ये ईडीकडून छापेमारी सुरुच, नागपूरमध्ये ईडीची धाड


मुंबईत एनसीबीकडून २ ठिकाणी छापेमारी, २ जणांच्या अटक तर ५० लाखांचे ड्रग्ज जप्त, छापेमारी करताना २ एनसीबी अधिकारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार बंगळुरु दौऱ्यावर असताना बोम्मई यांची भेटीला गेले


चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज ठाकरेंना पुन्हा भेटण्याचे संकेत

आमच्यातील राजकीय भेट एकमेकांच्या भूमिका जाणून घेण्यासाठीची – चंद्रकांत पाटील

एकत्र येऊन निवडणूका लढवण्याचा प्रस्ताव नाही – चंद्रकांत पाटील

आमच्या भेटीमध्ये युतीबाबत चर्चा झाली नाही – चंद्रकांत पाटील,

चंद्रकांत पाटील – राज ठाकरे भेट, चुतीची चर्चा नाही,

आमच्या भेटीत युतीबाबत चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिली आहे.


भाजप-मनसे युतीवर चर्चा होणार, चंद्रकांत पाटील राज ठाकरेंंच्या भेटीला


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण रेकर यांनी चर्चगेट स्टेशनवर लोकलने प्रवास केला आहे. मुंबईत ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचे रेलभरो आंदोलन सुरु आहे.

दोन लसीचे डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या अशी भाजपची मागणी, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन, कांदिवलीत आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन, ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले अशा नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा चर्चगेट रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न, लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी आंदोलन


मुंबईतील एका प्रसिद्ध अॅप चॅनलच्या मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लू डिजिटल प्रा.लि. कंपनीचे सीईओ विभु अग्रवाल, कंपनीच्या कंट्री हेड अंजली रैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकत नाही – संजय राऊत

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार चर्चा करायला मागत नाही – राऊत

केंद्र सरकार प्रमुख स्तंभ मोडीत काढायला निघालंय – संजय राऊत


बजरंग पुनिया उपांत्य फेरीत दाखल


बजरंग पुनिया उपांत्यपूर्व फेरीत दाखल, किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवलं


महिला हॉकी संघाचा ब्रिटनकडून पराभव झाला आहे. यामुळे महिला हॉकी संघाचे कांस्य पदक हुकले,  ब्रीटनने ४-३ असा पराभव केला आहे.


मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा, कोरोनामुळे पालकत्व गामावलेल्या विद्यार्थ्यांची संपुर्ण फी माफ तर इतर विद्यार्थ्यांना ३० टक्के फी माफीचे निर्देश


पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राला मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश, राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात होणार चौकशी


भारतीय महिला हॉकी संघाची दमदार खेळी, दुसऱ्या क्वार्टरमध्ये घेतली आघाडी पण ब्रीटनने गोल डागत केली बराबरी २-२ असा सामना


पुणे जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलतेबाबत आज आढावा बैठक, पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नसल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, भाजप-मनसे युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता


महिला हॉकी संघाचा सामना सुरु, आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा ब्रीटनसोबत सामना आहे. ब्रीटनने आक्रमक खेळी दाखवत १-० ने आघाडी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -