घरक्राइमNagpur Crime News : नागपूर विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस बंदोबस्तात वाढ

Nagpur Crime News : नागपूर विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस बंदोबस्तात वाढ

Subscribe

मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय नेत्यांपासून ते महत्त्वाची स्थळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. अशात, नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल आज (29 एप्रिल) विमानतळ प्रशासनाला मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर : मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय नेत्यांपासून ते महत्त्वाची स्थळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. अशात, नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल आज (29 एप्रिल) विमानतळ प्रशासनाला मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीच्या मेलनंतर नागपूर विमानतळ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. (Nagpur Crime News threat to blow up nagpur airport with bombs police security increased)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा मेल विमानतळ प्रशासनाला मिळाल्याची माहिती समोर आली. धमकीचा मेल मिळाल्यानंतर विमानतळ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या माध्यमातून विमानतळावर तपासणी करण्यात आली. परंतू, तपासणीमध्ये नागपूर विमानतळावर कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, केवळ नागपूरच नाही तर, देशभरातील अनेक विमानतळांवर अशा पद्धतीचे धमकीचे मेल आल्याची माहिती समोर येत आहे. या धमकीच्या मेलनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून त्यांनी पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष म्हणजे या धमकीच्या मेलचा अधिक तपास केला असता, सर्व ठिकाणी आलेले धमकीचे हे मेल एकाच सोर्समधून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

रविवारी अशाच पद्धतीचा मेल मुंबई विमानतळ प्रशासनाला आला होता. त्यानंतर आता आज नागपूर विमानतळ उडवून देण्याच्या धमकीचा मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विमानतळावर जाणाऱ्या येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

दक्षिण गोव्यातील दाबोलीम विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली, त्यानंतर सुरक्षा अधिकारी सतर्क झाले आणि कॅम्पसमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली.


हेही वाचा – Food Poisoning : अंडा बिर्याणीमुळे 40 रेल्वे प्रवाशांना विषबाधा; नागपूर स्थानकातील घटना

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -