घरक्राइमThane News : ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवक एम. के. मढवींना...

Thane News : ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; माजी नगरसेवक एम. के. मढवींना अटक

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षश्रेष्ठींसाठी पक्षातील नेत्यांपासून छोट्यातला छोटा कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यात सर्वांनी मदत लाभणं विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. असे असताना ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षश्रेष्ठींसाठी पक्षातील नेत्यांपासून छोट्यातला छोटा कार्यकर्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यात सर्वांनी मदत लाभणं विजयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. असे असताना ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी आणि त्यांचे चालक अनिल मोरे यांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Thane News uddhav Thackerays Shiv Sena ex corporater M K Madhvi arrested)

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिस आयुक्तालयातील खंडणी विरोधी पथकाकडे त्रिभुवन लालबिहारी सिंग (42) यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीचे एरोली परिसरात खोदकाम सुरु आहे. इंटरनेट केबल टाकण्याचे कॉन्ट्रक्ट त्यांच्या कंपनीला मिळाले होते. हे खोदकाम सुरू असताना ऐरोली, नवी मुंबई परिसरातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी त्रिभुवन सिंग यांना त्यांच्या ऑफीसमध्ये बोलावले. यावेळी 2 लाख 50 हजार रूपयांची खंडणी मागितली. तसेच त्यांच्या कळवा येथील घरी वारंवार फोन करून त्यांना पैसे देण्याची मागणी केली. मी नगरसेवक आहे. मला पैसे न दिल्यास काम बंद पाडेल, अशी धमकी दिली.

- Advertisement -

पुरावा सादर करत अटक

याप्रकरणी एम. के. मढवी यांच्याशी झालेले संभाषण त्रिभुवन लालबिहारी सिंग यांनी त्यांच्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड केले आहे. तसेच, 26 एप्रिल रोजी अडीच लाखांपैकी दीड लाख रूपये मढवी यांनी घेत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून एम. के. मढवी यांना अटक केली आहे.

हेही वाचा – Mahadev Betting App : अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक, मुंबई सीआयडीची कारवाई

- Advertisement -

त्यानुसार, शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी मढवी यांच्या ऐरोली येथील पक्ष कार्यालयात सापळा रचला आणि एम. के. मढवी यांनी त्रिभूवन सिंग यांच्याकडून एक लाख रूपये त्यांचा ड्रायव्हर अनिल सिताराम मोरे यांच्यामार्फत पक्ष कार्यालयात स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी एम. के. मढवी आणि त्यांचे चालक यांच्याविरोधात भा.दं. वि. कायदा कलम 384, 385, 387, 506, 506(2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून एम. के. मढवी यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. याआधी देखील असे धमकवण्याचे प्रकार झाले आहेत का? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येणार असल्याने मढवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Mumbai News : मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 7 आरोपींना अटक

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -