घरक्राइमMumbai News : मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 7 आरोपींना...

Mumbai News : मुंबईत लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 7 आरोपींना अटक

Subscribe

लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास करत सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या सात जणांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे.

मुंबई : लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सखोल तपास करत सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या सात जणांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सात आरोपी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांच्या तापासातून समोर आली आहे. (Mumbai News Police Arrested 7 Accused Of A Gang Who Selling Small Babies)

मिळालेल्या माहितीनुसार, वंदना अमित पवार, शितल गणेश वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर, डॉ. संजय सोपानराव खंदारे अशी आरोपींची नावे आहे. या सात जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून आतापर्यंत 14 लहान बाळांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता मुंबई पोलिसांना आपल्या कारवाईत 2 बाळांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan house Firing Case : बिष्णोई आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांर्गत कारवाई

लहान बाळ पळवणाऱ्या टोळीबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज (28 एप्रिल) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना अटक केल्यानंतर अधिक तपास केला असता, सातही आरोपी हे मुंबईतल्या काही रुग्णालयांमध्ये काम करत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता मुंबईतील काही रुग्णालये ही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणात एक आरोपी डॉक्टर आहे. या डॉक्टरचे दिवा येथे एक क्लिनिक आहे. हा डॉक्टर मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. या रॅकेटमधील त्याचा सहभाग आढळून आला आहे. कदाचित या डॉक्टरकडे लहान मुलांचे पालक गेले असावेत. तिथे त्यांचा संपर्क झाला असावा. असा संशय यावेळी पोलिसांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रोळीमधून एका बाळाची विक्री करुन रत्नागिरी देण्यात आले होते. तसेच, तेलंगणामधून या बाळांची डिमांड होती. त्यानुसार या बाळांची विक्री केली जात होती. तेलंगणा आणि हैदराबादमधून बाळांच्या खरेदीचा प्रस्ताव होता. अटक केलेल्या सर्व आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विक्री केलेल्या लहान बाळांमध्ये 11 मुले आहेत. तर 3 मुली आहेत. कमीत कमी 5 दिवस ते जास्तीत जास्त 9 महिने असे विक्री केलेल्या बाळांचं वय आहे.


हेही वाचा – Mahadev Betting App : अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक, मुंबई सीआयडीची कारवाई

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -