घरक्राइमCrime : महिला डॉक्टरची अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या; सुसाइड नोटमधून समोर...

Crime : महिला डॉक्टरची अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या; सुसाइड नोटमधून समोर आले कारण

Subscribe

ठाणे : एका महिला डॉक्टरने दक्षिण मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या आणि नुकत्याच लोकार्पण झालेल्या सर्वात लांब सागरी सेतूवरून म्हणजेच अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्या केली आहे. मृत महिलेच्या वडिलांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी महिलेचा मृतदेह सापडला नसला तरी तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. (Crime Female doctor commits suicide by jumping from Atal Bridge The reason emerged from the suicide note)

हेही वाचा – Politics : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; गुरुवारी दिल्लीत बैठक 

- Advertisement -

नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले की, सोमवारी आत्महत्येची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे वास्तव्यास असलेल्या 38 वर्षीय महिला डॉक्टर किंजल शहा हिने 18 मार्च रोजी दुपारी टॅक्सीने अटल सेतूपर्यंत प्रवास केला. महिलेने टॅक्सी चालकाला त्याठिकाणी थांबण्यास सांगितले आणि समुद्रात उडी मारली. पोलिसांनी सांगितले की, महिला डॉक्टरने समुद्रात उडी मारल्यानंतर टॅक्सी चालकाने तत्काळ आम्हाला माहिती दिली. यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली, मात्र यश आले नाही.

भिवंडी विभागातील भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये किंजल शहा हिच्या वडीलांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे हरवल्याची एफआयआर दाखल केली आणि किंजल शहा हिच्या घराची झाडाझडती घेतली असता त्यांना सुसाइड नोट सापडली. त्यात म्हटले होते की, मी गेल्या आठ वर्षांपासून प्रचंड नैराश्यात आहे आणि अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये. घटनास्थळी घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकालाही नाही, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LokSabha Election : नागपूर, चंद्रपूरसह पाच जागांसाठी अधिसूचना; महायुती, मविआचे उमेदवार कधी ठरणार?

दरम्यान, पोलिसांनी त्यादिशेने अधिक तपास केला असता, किंजल शहाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले. सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास किंजल टॅक्सीत बसली. त्यानंतर पोलिसांनी अटल सेतूवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 2 वाजून 14 मिनिटांनी किंजल हिने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याचे दिसून आले. गेल्या आठ वर्षांपासून किंजल शहा नैराश्यात होती. नैराश्येपोटी तिने अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, पोलीस अटल सेतू येथील समुद्रात मच्छिमारांच्या मदतीने किंजल शहा हिचा मृतदेह शोधत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -