घरक्राइमभारताच्या पराभवासाठी लहान भावासह वडिलांना धरले जबाबदार; मटण खाण्याचा वाद विकोपाला गेला...

भारताच्या पराभवासाठी लहान भावासह वडिलांना धरले जबाबदार; मटण खाण्याचा वाद विकोपाला गेला अन्…

Subscribe

अमरावती : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेच्या (ICC ODI World Cup 2023) अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. त्यामुळे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवाचा खेळाडूंना नाही तर भारतीय चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. मात्र भारताच्या या पराभवानंतर अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भावांमधील वाद विकोपाला गेला अन् मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. (Father along with younger brother held responsible for Indias defeat Eating mutton has gone out of business)

हेही वाचा – Bihar Accident : जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीने पाच जणांना चिरडले, बालकासह तिघांचा मृत्यू

- Advertisement -

भारताचा विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव देशातील 140 कोटी जनतेच्या जिव्हारी लागला. पराभवानंतर प्रत्येकाला अश्रू अनावर झाले. कारण विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा पराभव झाला होता. काहींनी आदळाआपट करत आपला राग व्यक्त केला. तर मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली. मात्र अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली. मटण खाल्ल्यामुळे दोन सख्ख्या भावाभावांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मोठ्या भावानं लहान भावावर आणि वडीलांवर लोखंडी सळईनं हल्ला केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्याचा आवाज ऐकल्याने अजूबाजूने नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपी प्रवीणला पकडून ठेवले आणि लहान भाऊ अंकित आणि वडील रमेश यांना दवाखान्यात भरती केले. मात्र डॉक्टरांनी अंकित इंगोलो (28) याला मृत घोषित केले. तर वडील रमेश इंगोले यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी प्रवीण इंगोलो (32) वर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. मात्र घटनेनंतर अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यात पुन्हा दगडफेक

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहत असताना तिघे जण घरी मद्यपान करत होते. यावेळी वडील आणि लहान भावाने मटन खाल्ले. भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारताचा पराभव मोठा भाऊ प्रवीणला रुचला नाही. त्याने भारताच्या पराभवासाठी वडील आणि लहान भावाला जबाबदार धरले. तुम्ही मटन खाल्लात म्हणून भारत हरला, असे म्हणत प्रवीणने दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला. वडीलांनी सुरुवातीला प्रवीणच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत त्याला फेकून मारला. याचा राग आल्याने प्रवीणने जवळील लोखंडी रॉडने वडीलांवर आणि लहान भावावर हल्ला केला. यात अंकित हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर वडील रमेशसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -