घरक्राइमअनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी 'त्याने' दोन्ही बहिणींना संपवले; Googleवर शोधत होता मारण्याची पद्धत

अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी ‘त्याने’ दोन्ही बहिणींना संपवले; Googleवर शोधत होता मारण्याची पद्धत

Subscribe

बहीण-भावाचे नाते म्हणजे सर्वात पवित्र नाते म्हणून आपल्याकडे पाहले जाते. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे घडली आहे.

अलीबाग : बहीण-भावाचे नाते म्हणजे सर्वात पवित्र नाते म्हणून आपल्याकडे पाहले जाते. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे घडली आहे. फक्त आणि फक्त अनुकंपावर नोकरी मिळवण्यासाठी एका भावाने चक्क त्याच्या दोन्ही बहिणींना विष देऊन मारून टाकले. यासाठी तो गुगलची मदत घेत होता हे विशेष.
ह्रदयाचा थरकाप उडवणारी घटना अलिबाग तालुक्यातील चौल थेथील भोवाळे गावात घडली. लागोपाठ नात्याने बहिणी असलेल्या महिलांचा मृत्यू झाल्याने हा प्रकार कशातून घडला असा प्रश्न अनेकांना पडला असतानाच या घटनेमागील कारण, जेव्हा समोर आले तेव्हा अनेकांच्या पायाखालची माती सरकली.(He killed both the sisters to get a job on Compassion Searching on Google for a method of killing)

अलिबाग तालक्यातील चौल येथील भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (वय 34) व स्नेहल मोहिते (वय 30) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोनालीचा 16 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. ही घटना रेवदंडा पोलिसांना मिळाली असता आरोपी गणेश मोहिते याच्या फिर्याद घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सोनाली मोहिते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असता तिचा मृत्यु जेवणातील विषबाधेमुळे झाला असल्याचे समोर आले. तर दुसरी बहिण स्नेहल मोहिते (वय 30) हिला उलट्याचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. स्नेहलला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला.

- Advertisement -

नातेवाईकांवर व्यक्त केला होता आधी संशय

स्नेहल व तिची आई जयमाला मोहिते यांनी सांगितले की, गणेशने सोनाली व स्नेहाला सूप दिल्यानंतर पाणी पिण्यासाठी तांब्या भरून घराबाहेर ठेवला होता. त्यावेळी भावकीतील नातेवाईकांनी त्यांना मारण्याच्या उद्देशाने विष टाकले असावे त्यामुळेच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला होता. कारण जयमाला मोहीते व त्यांच्या नातेवाईकांमध्ये बरेच वर्षापासून मालमत्तेच्या वादातून भांडण सुरु होते. या गोष्टीचा मनात राग धरून माझ्या मुलींबर विष प्रयोग झाला असल्याचे सांगितले.

हेही वाचा : BISHAN SINGH BEDI : माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदींचे निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

पोलीस तपासात वेगळीच माहिती आली समोर

घटनास्थळी जाऊन प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता इस्टेट व अनुकंपाच्या नोकरीसाठी गणेश मोहिते याने आपल्या बहीणींना संपविले असल्याचे समोर आले. तसेच आरोपी गणेश मोहीते याने आपणच दोन्ही बहीणींना संपविले असल्याचा कबुली जबाबही दिला.

हेही वाचा : Dussehra Gathering: दसरा मेळाव्यातून राजकीय ताकद दाखविण्यासाठी नेते सज्ज; तयारी अंतिम टप्प्यात

53 वेळा गुगलवरून घेतली मारण्याची माहीती

गणेश मोहिते आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये अनुकंपाच्या नोकरीवरून वाद होता. अनुकंपाच्या नोकरीसाठी तो वाट्टेल ते करण्यासाठी तयार होता. यासाठीच त्यांने डोक शांत ठेऊन दोन्ही बहीनींना संपविण्याचा डाव आखला होता. याचदरम्यान 15 ऑक्टोबर रोजी दोन्ही बहिणींना सुप बनवून त्यामध्ये विषारी औषध टाकून संपविले. गणेशने गुगलच्या माध्यमातून सर्च करून कोणत्या विषारी औषधाला जेवणातून वा पाण्यातून देताना वास येणार नाही याची खात्री करण्यासाठी साधारणता 53 वेळा गुगल वरून माहीती घेतली असल्याचे तपासात समोर आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -