Eco friendly bappa Competition
घर क्राइम बेपत्ता मेकअप आर्टिस्टची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन् 'या' राज्यात फेकला, काय...

बेपत्ता मेकअप आर्टिस्टची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरला अन् ‘या’ राज्यात फेकला, काय आहे प्रकरण?

Subscribe

वसई : मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या नायगावमधील मेकअप आर्टिस्ट (Naigaon Makeup Artist) नयना महंत (Naina Mahant) (29) हिची झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी (Naigaon Police) नयनाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोहर शुक्ला (Manohar Shukla) (43) याला अटक केली आहे. त्याने नयनाची हत्या करून तिचा मृतदहे सुटकेसमध्ये भरून गुजरातमध्ये फेकला आहे. (the murder of a missing makeup artist The body was stuffed in a suitcase and dumped in this state what is the matter)

नयना महंत ही तरुणी चित्रपटात हेअर स्टाईलिश म्हणून काम करत होती. ती नायगाव पूर्वेच्या सनटेक इमारतीत एकटी रहात होती. तिचा फोन 12 ऑगस्टपासून बंद येत असल्यामुळे तिच्या बहिणीने याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात नयना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपासणी सुरू करताना नयना राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी त्यांनी नयना महंत हिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर मनोहर शुक्ला सुटकेस घेऊन जाताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नीदेखील होती.

- Advertisement -

हेही वाचा – मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर बेपत्ता झाला होता मंजूर; आठ दिवसांनी सापडला मृतदेह

पोलिसांनी मनोहर शुक्ला याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हाची कबूली दिली आहे. त्याने नयनाची पाण्यात बुडवून हत्या केली. तसेच नयनाचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातच्या वलसाड येथील खाडीत फेकून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वलसाड पोलिसांना याबाबत माहिती दिली. वलसाड पोलिसांनी खाडीत शोधाशोध केली असता त्यांना नयना महंतचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी मनोहर शुल्का याला मंगळवारी सकाळी अटक केली आहे. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या पत्नीलाही आरोपी केले जाणार आहे, अशी माहिती सहाय्क पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इंडिगो विमानात पुन्हा एकदा महिलेचा विनयभंग; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हत्या करण्याचे कारण काय?

नयना महंत यापूर्वी वसईला रहात होती. तिचे चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मनोहर शुक्लासोबत प्रेमसंबंध होते. मात्र मनोहर शुक्ला नयनाला डावलून 2018 साली दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. त्याला आतात दोन वर्षांचा मुलगाही आहे. मात्र नयना महंत त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावत होती. 12 ऑगस्ट रोजीही दोघांमध्ये याच मुद्द्यावरून जोरदार भांडण झालं. यावेळी नयनाने फिनाईल Accid पिण्याचा प्रयत्न करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मनोहरने तिला रोखले आणि बाथरुमच्या बादलीत तिचे तोंड बुडवून तिला ठार केले.

- Advertisment -