घरदेश-विदेशअखेर मोस्ट वाँटेड अबू बकरला दुबईतून अटक

अखेर मोस्ट वाँटेड अबू बकरला दुबईतून अटक

Subscribe

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीसह अन्य एका आरोपीलादेखील अटक झाली आहे.

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीसह अन्य एका आरोपीलादेखील अटक झाली आहे. मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकर याला दुबईतून अटक झाली आहे. अबू बकर याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतली होती. तसेच आरडीएक्स आणण्यामध्ये आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या दुबईस्थित घरात शिजलेल्या बॉम्बस्फोटाच्या कटामध्ये तो सहभागी होता. दरम्यान, अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम हा अद्याप फरार आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली असून मुस्तफा डोसा याचा २०१७ साली मृत्यू झाला होता.

वाचा – २००६ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा

- Advertisement -

प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु

भारतीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर हा मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी एक होता. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, बऱ्याच काळापासून मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाचा – पाकिस्तान बॉम्बस्फोटाने हादरले; खैबरमध्ये बॉम्बस्फोटात ३० जण ठार

- Advertisement -

कोण होता अबू बकर

अबू बकरचे संपूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती. अबू बकर याच्या विरोधात १९९७ साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाली होती. तेव्हापासूनच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अबू बकर याचे दुबईत अनेक उद्योगधंदे असून त्याने एका इराणी महिलेशी विवाह केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -