घरताज्या घडामोडीभारतात ३ वर्षाच्या चिमुरडल्या करोनाची लागण, जगभरात १ लाख करोना पॉझिटीव्ह

भारतात ३ वर्षाच्या चिमुरडल्या करोनाची लागण, जगभरात १ लाख करोना पॉझिटीव्ह

Subscribe

जगभरात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोक करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत...

केरळच्या एका ३ वर्षाच्या मुलाला करोनाची लागण झाल्याची माहिती आज समोर आले आहे. केरळमधील हे दाम्पंत्य इटलीला गेले होते, आता चाचणीनंतर हे बाळ करोना पॉझिटीव्ह म्हणून समोर आले आहे. आतापर्यंतच्या करोनाची लागण झालेल्या प्रकरणात हे बाळ सर्वात कमी वयाचे म्हणून आढळले आहे.

केरळ पाठोपाठ देशाच्या राजधानी नजीकचे प्रकरणही समोर आले आहे. आग्रा येथील जिल्हा रूग्णालयातही एका कारखान्यातील कामगाराला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका व्यापाऱ्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तो व्यापारीही करोना पॉझिटीव्ह सापडला आहे. हा नवीन रूग्ण सध्या आग्रा येथे उपचार घेत आहे. तर अलिगढ येथील चार रूग्णही सध्या उपचार घेत आहेत. तर सिद्धार्थ नगर येथील ४ रूग्ण हे उपचार घेत आहेत. देशात आता करोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ४१ झाली आहे. आतापर्यंत जगभरातील करोन पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही ९० देशांमध्ये आढळली आहे. जवळपास १ लाख करोन पॉझिटीव्हची प्रकरणे जगभरातून समोर आली आहेत. तर तीन हजारांहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने रविवारी पाच नवीन रूग्णांचा समावेश करोना पॉझिटीव्हच्या यादीत केला होता. हे पाचही रूग्ण हे इटलीला जाऊन आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -