घरट्रेंडिंगYES Bank : पंतप्रधान, अर्थमंत्री झोपा काढत होते का ?

YES Bank : पंतप्रधान, अर्थमंत्री झोपा काढत होते का ?

Subscribe

प्रत्येक आर्थिक घोटाळ्यात गांधी परिवाराचे कनेक्शन, भाजपचा आरोप

भारतीय जनता पक्षाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विटरवरून गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. येस बॅंक घोटाळ्याच्या निमित्ताने गांधी परिवाराला लक्ष्य करण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या आर्थिक गुन्ह्यात गांधी परिवाराची काही ना काही लिंक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याआधीही विजय मल्ल्यांचे गांधी परिवाराचे असलेले संबंध त्यांनी ट्विटमधून उघड केले आहेत. विजय मल्ल्या यांचे सोनिया गांधी यांचे कसे संबंध होते यावर त्यांनी भाष्य केले आहे. विजय मल्ल्या हे सोनिया गांधी यांना फ्लाईट्सचे अपग्रेडेड तिकीट पाठवायचे. तसेच मनमोहन सिंह आणि पी सी चिदंबरम यांच्या संपर्कात विजय मल्ल्या होते असाही खुलासा या ट्विटमधून करण्यात आला आहे. आता विजय मल्ल्या फरार आहेत. नीरव मोदी यांनी सुरू केलेल्या ब्रायडल ज्वेलरी कलेक्शनचे राहुल गांधी यांनी उद्घाटन केले होते. तेदेखील फसवून निघून गेले. राणा कपूर यांनीही प्रियंका वद्रा यांच्याकडून पेंटिंग खरेदी केले आहेत, असे ट्विट मालविया यांनी केले आहे. कॉंग्रेसने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत खुलासा केला आहे.

कॉंग्रेसने केलेल्या खुलाशात भाजपचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु यांनी केलेल्या खुलाशा नुसार सरकारचा हा आंधळा कारभार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. येस बॅंकेतले कर्ज हे ५५ हजार ६३३ कोटी इतके २०१४ मध्ये होते. २०१९ अखेरीस हे कर्ज २ लाख ४१ कोटी ४९९ इतके झाले, हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये झाले. नोटाबंदीनंतरही हे कर्ज ९८ कोटी २१० रूपयांवरून आता २०१८ मध्ये २ लाख ३ हजार कोटींवर पोहचले. पंतप्रधान आणि अर्थमंत्री झोपा काढत होते का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रियंका गांधीने तिच्या वडिलांकडे असलेली एम एफ हुसेन यांची पेंटिंग येस बॅंकेच्या राणा कपुर यांना २ कोटी रूपयांना विकली. या पेंटींगची किंमत ही २०१० सालच्या आयकर भरण्यात समाविष्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -