घरट्रेंडिंगसोन्याचा ११ वर्षातला 'रेकॉर्ड' ब्रेक, एकाच आठवड्यात ७ टक्के वाढ

सोन्याचा ११ वर्षातला ‘रेकॉर्ड’ ब्रेक, एकाच आठवड्यात ७ टक्के वाढ

Subscribe

गेल्या आठवड्यात सोन्याच्या वाढत्या किंमतीने ११ वर्षांतला रेकॉर्ड मोडला आहे

सोन्याच्या किंमतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ७ टक्के इतकी विक्रमी वाढ एकाच आठवड्यात नोंदविण्यात आली. जगभरात करोना व्हायरसच्या दहशतीमुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. तर भारतातही करोना व्हायरसचा आणि येस बॅंक घोटाळ्याचा परिणाम हा रूपयाची घसरण होण्यावर झाला आहे. या संपुर्ण आठवड्यातही सोने, चांदी या धातूंचे दर चढे राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव हा ४६ हजाराहून अधिक राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याला विक्रमी असा ४४ हजार ९६१ रूपये प्रति तोळा (१० ग्रॅम) असा विक्रमी किंमत गाठली होती. संपुर्ण आठवड्यात सोन्याच्या भावात ७ टक्के वाढ होण्याचा ट्रेंड हा तब्बल ११ वर्षांनंतर पहायला मिळाला आहे.

भारतात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आज प्रति तोळा सोन्याचा भाव ४५ हजार ६९७ रूपये इतका खाली आला. जगभरात गेल्या सात वर्षात सर्वाधिक असा सोन्याला भाव मिळाला आहे. गुंतवणुकदारांनी सोन्याला पसंती देत सोन्यामधील गुंतवणुकीला प्राधान्य दिली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींने शेअर मार्केटवर परिणाम होत असतानाच सोन्यासाठी मात्र गुंतवणुकदारांनी प्राधान्य दिले आहे. गेल्या २०१२ पासूनची ही सर्वाधित मिळालेली किंमत आहे. सोन्याचा दर घसरलेला असला तरीही चांदीची किंमत मात्र ०.३ टक्क्यांनी वाढली आहे. तर प्लॅटिनममध्ये १.२ टक्के घसरण झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये सोन्याच्या किंमतीत १८ टक्के वाढ झाली होती. आज सौदी अरेबियाने आपल्या तेलाच्या किंमती कमी केल्याने जवळपास ३० टक्क्यांनी तेलाच्या किंमतीही घसरल्या आहेत.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हमार्फत व्याजदरात कपात केल्यानंतरचा परिणामही सोन्याच्या किंमतीवर झाला होता. भारतात रूपयाच्या झालेल्या अवमूल्यनामुळेही सोन्यातील गुंतवणुकीला चांगले दिवस आले आहे. भारतातील स्थानिक सराफा बाजारात १२.५ टक्के आयात कर आणि ३ टक्के जीएसटीचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -