भोपाळमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या बसमध्ये बलात्कार; चालकासह महिलेला अटक

मुलीने दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन तक्रार दाखल केली. तसेच, सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली असून, शाळा व्यवस्थापनाने फुटेज दाखवण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने बसमधील महिला मदतनीसला बोलावून चौकशी केली असता, मुलगी बसमध्ये पाणी पीत असल्याचे तिने सांगितले.

12 Year girl raped by Uncle in Chandrapur

एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळमधील रातीबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित खासगी शाळेतील नर्सरीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसमध्येच बलात्कार करण्यात आला आहे. (3 year old girl raped in shocking school bus both driver and female helper arrested)

नेमके प्रकरण काय?

पीडित मुलीचे वय अवघे 3 वर्षे 6 महिने असल्याची माहिती मिळते. ही घटना 8 सप्टेंबर रोजी घडली होती. 8 सप्टेंबर रोजी चिमुरडी शाळेतून घरी परतली, तेव्हा तिचा शाळेचा ड्रेस बदलण्यात आला होता. मुलीच्या आईने तिला शाळेचा ड्रेस बदलण्याचे कारण विचारले असता, तीने ‘ड्रायव्हर काका मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करतात आणि त्यांनी माझा ड्रेस बदलला’, असे सांगितले.

मुलीने दिलेल्या माहितीनंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी शाळा व्यवस्थापनाची भेट घेऊन तक्रार दाखल केली. तसेच, सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली असून, शाळा व्यवस्थापनाने फुटेज दाखवण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागितली आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने बसमधील महिला मदतनीसला बोलावून चौकशी केली असता, मुलगी बसमध्ये पाणी पीत असल्याचे तिने सांगितले. टी-शर्टवर पाणी पडले होते. त्यामुळे त्याचा टी-शर्ट बदलावा लागला. शाळा व्यवस्थापनाच्या या गोष्टीवर कुटुंबीयांचा विश्वास बसत नव्हता. मुलीने आईला सांगण्यापूर्वीच चालक काकांनी तिच्यासोबत गैरकृत्य केले. सोमवारी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी केली, तेव्हा त्यांचे म्हणणे संशयास्पद वाटले.

या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चालक आणि महिला मदतनीस दोघांनाही अटक केली आहे. तसेच, रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर काँग्रेसने राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मध्य प्रदेशात कुठेही मुली सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या मीडिया विभागाचे उपाध्यक्ष अजय यादव यांनीही शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणाची दखल घेऊन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाबाबत “पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सुरुवातीला शाळा व्यवस्थापनावर चकरा मारल्याचा आरोप होत आहे. याबाबत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापन दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल”, असे गृहमंत्री डॉ नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले.


हेही वाचा – स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, उद्योगप्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले