Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपची राजकीय खेळी, ६ महिन्यांत ४ मुख्यमंत्र्यांचा पायउतार

भाजपची राजकीय खेळी, ६ महिन्यांत ४ मुख्यमंत्र्यांचा पायउतार

Related Story

- Advertisement -

गुजरातच्या राजकारणात शनिवारी एकच खळबळ उडाली. कारण मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण? कोणाला मंत्रिपदातून बाहेर पडावं लागणार या चर्चांना उधाण येऊ लागलं आहे. पण भाजपच्या राजकीय खेळीमध्ये ६ महिन्यांत ४ मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या भाजप चेहऱ्याचे राजकारण करत असल्याचे म्हटले जात आहे.

चाल, चारित्र्य आणि चेहरा हे भाजपचे राजकारणातील तीन सुत्र आहेत. पण आता भाजपला चेहरा जास्त महत्त्वाचा झाल्याचे दिसून येत आहे. भाजपचा चेहरा बदलण्याच्या रणनीतिचा शिकार आता विजय रुपाणी झाले आहेत. भाजपने गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा गेम ओव्हर केला आहे. निवडणुकी अगोदर पदापासून दूर करणाऱ्या यादीत त्यांचे नाव सामील झाले आहे. मार्च ते सप्टेंबरपर्यंत म्हणजेच फक्त ६ महिन्यांत ४ मुख्यमंत्र्यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. उत्तराखंडमधील त्रिवेंद्र सिंह रावत, नंतर तीर्थ सिंग रावत, बी.एस. येडियुरप्पा आणि आता विजय रुपाणी यांचे नाव या यादीत जोडले गेले आहे. विजय रुपाणी यांचे पद धोक्यात तर होते. त्यांची गादी जाण्याचे चिन्ह दिसत होते, परंतु कोरोनाची दुसरी लाट मंदावल्यानंतर असे वाटले होते की, त्यांच्या डोक्यावरचा धोका टळला असेल. शनिवारी सकाळी ११ वाजता विजय रुपाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात उपस्थित होते. परंतु त्यावेळेस विजय रुपाणी राजीनामा देतील असे दिसले देखील नाही. दुपारी ३ वाजता रुपाणी यांनी राजीनामा दिला. भाजपच्या या रणनीतिचा विजय रुपाणी शिकार झाले.

- Advertisement -

दरम्यान ९ मार्च २०२१ रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा साडे तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ होता. मग त्यानंतर तीर्थ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. १० मार्चला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण त्यानंतर २ जुलैला त्यांनी देखील राजीनामा दिला. चार महिन्यांपेक्षा कमी काळासाठी तीर्थ सिंह रावत मुख्यमंत्री पदावर होते. मग त्यांच्यानंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी पुष्कर सिंह धामी यांना बसवण्यात आले. मग भाजपच्या रणनीतिचे वी.एस. येडीयुरप्पा शिकार झाले. २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ येडीयुरप्पा यांनी घेतली होती आणि २६ जुलै २०२१ येतायेता त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बासवराज बोम्मई झाले.

येडीयुरप्पा यांच्यानंतर गुजरात भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. ५ वर्षांहून अधिक त्यांचा कार्यकाळ राहिला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – अमित शहा यांनी एका रात्रीत बदललं गुजरातच राजकारण!


 

- Advertisement -