घरटेक-वेकआता टाईप न करता WhatsApp वर पाठवता येणार मॅसेज; जाणून घ्या प्रक्रिया

आता टाईप न करता WhatsApp वर पाठवता येणार मॅसेज; जाणून घ्या प्रक्रिया

Subscribe

सोशल मीडियातील सर्वाधिक युजर्स असणारं अॅप्लिकेशपैकी एक म्हणजे WhatsApp. WhatsApp हे एक प्रसिद्ध इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या अॅप्लिकेशद्वारे आता टाइप न करता मॅसेज पाठवणं शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला अॅडवान्स व्हॉईस रिकग्निशनची मदत घ्यावी लागणार आहे. ही ट्रिक अँड्रॉइड फोनवर कार्य करते. मात्र यासाठी तुम्हाला काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील. या सेटिंग बदलल्यानंतर तुम्ही WhatsApp वर टाइप न करताही मेसेज करू शकतात.

जेव्हा तुमच्याकडे फोनचं अॅक्सेस नसेल तेव्हा हे फीचर तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. गुगल असिस्टंटने २०१५ मध्ये व्हॉइससह WhatsApp मेसेज पाठवण्याची सुविधा सुरू केली. Apple siri ने 2016 मध्ये हे फिचर लाँच केले. याच्या मदतीने थर्ड पार्टी अॅप्सवरून व्हॉइसद्वारे मॅसेज पाठविले जाऊ शकतात. अँड्रॉइड फोनमध्ये टाईप न करता व्हॉट्सअॅप मेसेज कसा पाठवायचा जाणून घ्या प्रक्रिया.

  • सर्वप्रथम तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन गुगल असिस्टंटच्या उजव्या कोपऱ्यावरील तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा
  • त्यानंतर पर्सनल रिझल्टवर खाली स्क्रोल करून या फंक्शनला ऑन करा
  • व्हॉइस असिस्टंट अॅक्टिव्हेट करण्यासाठी, तुम्हाला Hey Google किंवा OK Google म्हणावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला Send a whatsapp Msg असे म्हणावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे त्याचे नाव घेऊन गुगल असिस्टंट तुम्हाला विचारेल तुम्हाला कोणता मॅसेज पाठवायचा आहे.
  • तुम्हाला जो काही मॅसेज पाठवायचा आहे, तो तुम्हाला Send It म्हणून तो पाठवता येणार आहे. या फिचरमुळे टाइप न करता Google असिस्टेंटच्या मदतीने व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवू शकता.

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; २४ कुटुंबांचे स्थलांतर

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -