घरदेश-विदेशओबाननंतर मादी चित्ताचेही कुनो नॅशनल पार्कमधून पलायन

ओबाननंतर मादी चित्ताचेही कुनो नॅशनल पार्कमधून पलायन

Subscribe

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांची अवस्था विचित्र झाली आहे. कारण गेल्या चार दिवसांपूर्वी ओबान नावाचा चित्ता पळून गेला होता. त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अजून एका आशा नावाच्या मादी चित्त्यानेही नॅशनल पार्कमधून पलायल केले आहे. आशा सध्या शिवपुरी जिल्ह्य़ाकडे वाटचाल करत आहे, मात्र लोकांना चित्त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे सांगितले नस्लयामुळे अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियाहून कुनो येथे आठ चित्ते आणले होते. यातील ५ मादी, तर ३ नर चित्त्यांचा समावेश होता. मोदींच्या हस्ते ओबान आणि आशा जोडप्याला नॅशनल पार्क परिसरात सोडण्यात आले होते. 4 दिवसांपूर्वीच ओबान नावाच्या चित्त्याने नॅशनल पार्कमधून पयालय केले होते. तो विजयपूर तालुक्यातील गोली पुरा आणि झाड बडौदा गावाच्या परिसरात आढळून आला आहे. पण आता आशानेही पलायन केल्यामुळे अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपासून कुनोच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ओबान फिरत आहे. कधी शेतात तर कधी नदीत पाणी पिताना तो दिसत आहे. हे ठिकाण रहिवासी भागांपासून दूर आहे. प्रोजेक्ट चीताचे अधिकारी आता त्यांना डार्टिंगच्या माध्यमातून पकडण्याचा विचार करत आहेत. यासंदर्भात आज (६ एप्रिल) निर्णय होण्याची शक्यता आहे. डार्टिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये बाण मारून प्राणी बेशुद्ध केले जातात.

कुनो नॅशनल पार्कपासून आशाचा पूर्वेकडे मागोवा घेण्यात आला आहे. चित्ताचा सामना कसा करायचा याबाबत इथे राहणाऱ्या लोकांना काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे अधिकारी अधिक चिंतेत आहेत. कुनोच्या आजूबाजूला ज्या जंगलात हे दोघे फिरत आहेत, तो भाग आफ्रिकेच्या सवाना गवताळ प्रदेशासारखा दिसतो.

- Advertisement -

चित्ताच्या संरक्षणासाठी कुत्रा
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्तांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. महिला जर्मन शेफर्ड डॉग इलू सात महिन्यांच्या विशेष प्रशिक्षणानंतर मंगळवारी पंचकुला येथून उद्यानात आणण्यात आले आहे. यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकारींना पकडण्यास मदत होईल. 11 महिन्यांचा इलू कुत्रा आता कुनो नॅशनल पार्कच्या जंगलात प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून शिकारींना येण्यापासून रोखेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -