घरक्राइमऐकावे ते नवल: आठवडाभरापूर्वी बांधलेला बसस्टॉप गेला चोरीला; कुठे घडला हा प्रकार? वाचा-

ऐकावे ते नवल: आठवडाभरापूर्वी बांधलेला बसस्टॉप गेला चोरीला; कुठे घडला हा प्रकार? वाचा-

Subscribe

बगळुरूमध्ये आयुक्त कार्यालयाच्या मागे कनिंगहॅम रोडवर 10 लाख रुपये खर्च करून बस स्टॉप बांधण्यात आले होते. ते बनवल्यानंतर अवघ्या आठवडाभरात ते गायब झाले.

बंगळुरू : आपल्या देशात कधी काय घडेल सांगता येत नाही. कोण कधी काय करेल याचा अनुमान लावणेच कठीण. असाच एक सगळ्यांना आश्चर्यचकीत करणारा प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे घडली. फक्त एका आठवडाभरापूर्वी 10 लाख रुपये खर्च करून बांधलेले बसस्टॉपच चोरीला गेले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या चोरीची चर्चा होत आहे. (A surprise to hear The bus stop built a week ago was stolen Where did this happen? read-)

बगळुरूमध्ये आयुक्त कार्यालयाच्या मागे कनिंगहॅम रोडवर 10 लाख रुपये खर्च करून बस स्टॉप बांधण्यात आले होते. ते बनवल्यानंतर अवघ्या आठवडाभरात ते गायब झाले. हे बस स्टॉप 21 ऑगस्ट रोजी बांधण्यात आले होते. आणि 28 ऑगस्ट रोजी गायब झालs आणि एक महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली. बीएमटीसी बस शेल्टरच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या कंपनीने हाय ग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही चोरी कुणी केली याबाबत पोलीस सध्या जवळपासच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : भृण प्रत्यारोपण सेवा थेट शेतकऱ्यांच्या दारी; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

परिवहन मंत्री म्हणाले आम्ही बस थांबे बांधत नाही

कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) कोणतेही बस थांबे बांधत नाही. ते म्हणाले की, आता ब्रुहत बंगळुरू महानगरपालिका (बीबीएमपी) बांधकाम करेल. मी आयुक्तांशी बोलून तिथे नवीन बसस्थानक आहे का ते बघेन.

- Advertisement -

हेही वाचा : गोरेगाव अग्नीकांडाची होणार उच्चस्तरीय चौकशी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

काय प्रकरण आहे?

बस बस स्टॉप चोरीची ही घटना कनिंगहॅम रोड, बंगळुरू येथील आहे. येथे आठवडाभरापूर्वी 10 लाख रुपये खर्चून बसस्थानक बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता तिथे बस स्थानक नाही. स्टील स्ट्रक्चरसह त्याची चोरी झाली आहे. तब्बल आठवडाभरानंतर बसस्थानकात चोरीची घटना उघडकीस आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -