घरदेश-विदेशकंत्राटदार आत्महत्या प्रकरणात कर्नाटकच्या मंत्र्याचे नाव; दिल्ली ते बंगळुरूपर्यंत राजकीय गोटात खळबळ;...

कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात कर्नाटकच्या मंत्र्याचे नाव; दिल्ली ते बंगळुरूपर्यंत राजकीय गोटात खळबळ; ईश्वरप्पांची खुर्ची जाणार?

Subscribe

कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांच्यासमोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वरप्पा यांची खुर्ची जाणार असल्याचे निश्चित असल्याने ते लवकरचं राजीनामा देऊ शकतात. यापूर्वी ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा भाऊ प्रशांत याने ईश्वरप्पा यांच्या विरोधात तक्रार करत अनेक आरोप केले आहेत.

कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचे आरोप करणारे कंत्राटदार संतोष पाटील यांनी मंगळवारी उडुपीमध्ये आत्महत्या केली. पाटील हे हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव होते. मात्र त्यांच्या आत्महत्येसाठी आता कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले जात आहे.

- Advertisement -

याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येमागचे सत्य लवकरचं समोर येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. तसेच मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.

पत्रकारांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की, केएस ईश्वरप्पा यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. यासोबतच कंत्राटदार संतोष पाटील यांच्यासह आपल्याच लोकांकडून 40 टक्के कमिशन मागितल्याबद्दलही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

- Advertisement -

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पाटील हा काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता, त्याचा शोध घेण्यासाठी बेळगाव पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूसाठी ईश्वरप्पा थेट जबाबदार असतील त्यामुळे मंत्र्याला शिक्षा झाली पाहिजे असा मेसेज आपल्या मित्रांना पाठवला होता.

काही आठवड्यांपूर्वी पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते की, त्यांनी ईश्वरप्पा यांच्या तोंडी सूचनेनुसार त्यांच्या गावातील रस्ते बांधणीसाठी 4 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यांनी मंत्र्यावर खोटेपणा, भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा आरोप केला आणि पंतप्रधान मोदींना ईश्वरप्पा यांना त्यांची बिले निकाली काढण्यास सांगण्याची विनंती केली.


हिंदूंना दहशतवादी होण्याचा सल्ले देणाऱ्या वादग्रस्त पुलकित महाराजला अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -