घरदेश-विदेशOCCRP अहवालातून करण्यात आलेल्या आरोपांचे अदानी समूहाने केले खंडन

OCCRP अहवालातून करण्यात आलेल्या आरोपांचे अदानी समूहाने केले खंडन

Subscribe

OCCRP च्या अहवालातून अदानींवर जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्याचे अदानी समुहाकडून खंडण करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन अदाणी समुहाकडून सादर करण्यात आले असून त्यांच्याकडून या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबई : अदानी समुहाकडून स्वतःचे शेअर्स खरेदी करून त्यामार्फत स्टॉक एक्सचेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा करण्यात आला आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP) हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्ससोबत शेअर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंडनबर्गच्या अहवालामुळे त्रस्त असलेल्या गौतम अदानी यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, OCCRP च्या अहवालातून अदानींवर जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्याचे अदानी समुहाकडून खंडण करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन अदाणी समुहाकडून सादर करण्यात आले असून त्यांच्याकडून या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Adani Group has denied the allegations made in the OCCRP report)

हेही वाचा – गौतम अदानी यांच्या अडचणी संपेना, OCCRP च्या अहवालातून करण्यात आले नवे आरोप

- Advertisement -

अदानी समुहाने या आरोपांचे खंडन करत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंडनबर्गच्या बदनाम अहवालाची पुनर्रचना करण्यासाठी परदेशी मीडियाला हाताशी धरून जॉर्ज सोरोस-फंडेड OCCRP द्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आल्याचे दिसून येत आहे. खरे तर आम्हाला हीच अपेक्षा होती. विशेष म्हणजे आठवड्यापूर्वीही माध्यमांनी अशीच भीती व्यक्त केली होती. अदानी समूहाने सांगितले की, स्वतंत्र निर्णय घेणारे प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरण या दोघांनीही मूल्यांकन वाढलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि व्यवहार लागू कायद्यांनुसार झाले आहेत.

तसेच, चालू असलेल्या नियामक प्रक्रियेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या योग्य प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला आमचे खुलासे आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकांच्या गुणवत्तेवर विश्वास आहे. या तथ्यांच्या उजेडात अहवालाची वेळ संशयास्पद आणि दुर्भावनापूर्ण आहे आणि आम्ही हा अहवाल स्पष्टपणे नाकारतो. कोणतेही अति मूल्यांकन आढळले नसल्यामुळे पैशाच्या व्यवहारासंबंधीच्या या आरोपांना कोणताही संबंध किंवा आधार नाही, असेही अदानी समुहाकडून आपल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने मॉरिशस आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेलद्वारे झालेले व्यवहार पाहिले असून यामध्ये गुंतवणूकदारांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहाचे शेअर्स खरेदी-विक्री केल्याची दोन प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, पहिल्यांदाच अदानी समूहाने मॉरिशसमध्ये केलेल्या व्यवहारांचा तपशील जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2013 ते 2018 या कालावधीत अदानी समुहात सहभागी असलेल्या कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले, असल्याचा आरोप OCCRP कडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -