Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न; एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर भारनियमनाचाही फटका

शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न; एकीकडे दुष्काळी परिस्थिती तर भारनियमनाचाही फटका

Subscribe

नाशिक : जानोरी येथील एका शेतकर्‍याने भारनियमनाच्या विरोधात सबस्टेशनला जावून मंगळवारी रात्री आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंभीर बाब असतांनाही जानोरी येथील संबंधित स्थानिक सहाय्यक अभियंता यांनी मोबाईल बंद ठेवत कोणताही प्रतिसाद दिला नाही. दुसर्‍या दिवशी दिवशी स्थानिक पदाधिकारी सबस्टेशनला जावून अधिकार्‍याची वाट बघत असतांनाही दुपारी १ वाजेपर्यंत संबंधित अधिकारी ऑफिसला आलेच नाही. दुपारी आल्यानंतर स्थानिक पदाधिकार्‍यांना उर्मट उत्तरे देत रोष निर्माण केला. या विरोधात संताप व्यक्त करत संबंधित अधिकार्‍यांनी शेतकर्‍याची माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा माजी जिल्हा परिषद गटनेते व मविप्र संचालक प्रविणनाना जाधव यांनी केले आहे.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील सबस्टेशनवरुन वारंवार विजपुरवठा खंडीत केला जात असल्याच्या विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. रात्रीच्या सुमारास या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कमीत कमी रात्री तरी लाईट असू द्या अशी विनवणी शेतकरी वर्गाकडून होत आहे तरी देखील इमर्जन्सी लोड शेडिंग या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जातो. मंगळवारी रात्रीच्या सुमारास या खंडित विद्युत पुरवठ्याच्या विरोधात स्थानिक शेतकर्‍याने जानोरी येथील सब स्टेशनला जाऊन संबंधित अधिकारी सहाय्यक अभियंता वडनेरे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यांचा मोबाईल बंद ठेवल्याने त्या शेतकर्‍याला समर्पक उत्तरे मिळाली नाही. संतापलेल्या शेतकर्‍याने तेथेच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

- Advertisement -

परंतु स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने होणारा मोठा अनर्थ टळला. दुसर्‍या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधी सब स्टेशनला जाऊन संबंधित सहाय्यक अभियंता वडनेरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता दुपारी एक वाजेपर्यंत संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयात हजर राहिले नाही. रात्री येथे एका शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब लक्षात न घेता संबंधित अधिकारी अजूनही कार्यालयाकडे का येऊ शकले नाही याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत ओझर विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदिप शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सहाय्यक अभियंता वडनेरे दुपारी एक वाजता कार्यालयात हजर झाले. झालेल्या प्रकाराबद्दल उपस्थित ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना समर्पक उत्तर देण्याऐवजी उर्मटपणे उत्तरे दिली. याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -