घरदेश-विदेशAdani Vs Thackeray : दिल्लीत दोघे विकायला बसले आहेत आणि तो माल......

Adani Vs Thackeray : दिल्लीत दोघे विकायला बसले आहेत आणि तो माल… ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भाजपा सरकारने देशाची सार्वजनिक संपत्ती विकायला काढली आणि ती विकत घेणारे एकमेव नाव म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी. विमानतळे, सार्वजनिक उपक्रम, बंदरे, रस्ते, सरकारी जमिनी, वृत्तसंस्था या सगळ्यांवर भाजपापुरस्कृत भांडवलदार अदानी यांनी कब्जा मिळवला आहे. त्यात आता धारावी झोपडपट्टीची भर पडली. दिल्लीत दोघे विकायला बसले आहेत आणि तो माल दोघे खरेदी करतात. त्यात अदानी यांचा वाटा मोठा आहे, अशी जोरदार टीका ठारे गटाने केली आहे.

हेही वाचा – Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमधील रुग्णालयात, विषप्रयोग झाल्याची चर्चा

- Advertisement -

गौतम अदानी यांच्याबाबत कोणी आवाज उठवला की, भारतीय जनता पक्षाला मिरच्या झोंबतात व ते सगळे ताडताड उडतात. अदानी हे मोदीकृत भाजपाचे नाजूक जागेचे दुखणे असावे, हे तर नक्कीच. कारण विरोधकांनी अदानी यांच्या एखाद्या उपद्व्यापाबाबत प्रश्न उपस्थित करताच भाजपाचे तांडव सुरू होते. त्यांच्या अंगात आग्यावेताळ संचारतो आणि प्रश्नकर्त्यांच्या अंगावर ते हमरीतुमरी करत धावून जातात. हेच आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबतीतही दिसून आले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये घुसली रुग्णवाहिका! पुढे घडले असे काही…

- Advertisement -

अदानी यांच्या उपद्व्यापावर प्रश्न विचारणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत सातत्याने अदानी यांच्या कारनाम्यावर प्रश्न विचारले. त्यामुळे भाजपा इतकी खवळली की, येनकेनप्रकारेण त्यांनी महुआ यांना संसदेतूनच बाहेर फेकून दिले. आता धारावीवर प्रश्न विचारणाऱ्यांना भाजपावाले सुळावर चढवतात की, फासावर लटकवतात तेच पाहायला हवे, अशी खोचक टिप्पणी देखील ठाकरे गटाने केली आहे.

गौतम अदानी यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे नेमके नाते काय, हे त्यांनी एकदा जाहीर केले पाहिजे. या नात्याविषयी लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. हे नाते नैतिक की अनैतिक, यावरही खुलासा व्हायला हवा. हे महाशय टाटा, बिर्ला, बजाज, अझिझ प्रेमजी, नारायण मूर्ती नाहीत. उद्योगपती आणि शेठजी यात फरक आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -