घरदेश-विदेशViral: या आजींचे थक्क करणारे स्केटींग... पण व्हिडीओमागच्या सत्याने नेटकरी मात्र नाराज

Viral: या आजींचे थक्क करणारे स्केटींग… पण व्हिडीओमागच्या सत्याने नेटकरी मात्र नाराज

Subscribe

या वृद्ध महिला मोकळ्या रस्त्यावर स्केटिंग करताना दिसत आहेत. या 'आजी'ची स्टाईल पाहून तुम्हीही नक्कीच प्रभावित व्हाल. त्यामुळे पुन्हा एकदा हे फोटो काळजीपूर्वक पहा. सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली ही छायाचित्रे प्रत्यक्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने तयार केली आहेत.

काही वयस्कर मंडळी त्यांच्या वयाला लाजवेल अशा काही गोष्टी करत असतात. वयस्कर मंडळी नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला आपण पाहिला आहे. त्यांचा उत्साह पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सध्या अशाच काही वृद्ध महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात या वृद्ध महिला मोकळ्या रस्त्यावर स्केटिंग करताना दिसत आहेत. या ‘आजी’ची स्टाईल पाहून तुम्हीही नक्कीच प्रभावित व्हाल. त्यामुळे पुन्हा एकदा हे फोटो काळजीपूर्वक पहा. सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली ही छायाचित्रे प्रत्यक्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने तयार केली आहेत. ( AI Generated Picture Viral This grandmother s amazing skating skills but netizens are upset with the truth behind the video )

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. सोशल मीडियावर आपल्याला दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळते. कलाकाराच्या कल्पनेला पंख देणाऱ्या या तंत्राने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आशिष जोस नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या या वृद्ध महिला प्रत्यक्षात AIने जनरेट केलेल्या आहेत. मिडजर्नी सारख्या अॅपचा वापर करून तयार केल्या आहेत. परंतु, हे फोटो पाहून या महिला वास्तविक नसून काल्पनिक निर्मिती आहेत याचा अंदाज लावणं फार कठीण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Jose (@tarqeeb)

- Advertisement -


( हेही वाचा: अजित पवारांचा पूर्णविराम नसून अल्पविराम; दादांच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते ‘देवगिरी’वर )

फोटोंना कॅप्शन देत आशिषने लिहिले, ‘स्केटिंग नानी.’ स्केटिंग नानीच्या या पोस्टवर ८५ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘नाही.. मी स्पष्टपणे पाहिले आणि ते फोटोशॉप केलेले आहे हे समजण्यापर्यंत मला खूप आनंद झाला. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘नाही, हे खरंय, मला यावरच विश्वास ठेवायचा आहे.

- Advertisement -

(  हेही वाचा: जगातील सर्वाधिक लोकसंख्येत चीनला मागे टाकत भारत नंबर One; UNFPA ने जाहीर केली आकडेवारी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -