घरमनोरंजनथाला ते थलपति, 'या' नावाने तमिळ superstar का ओळखले जातात?

थाला ते थलपति, ‘या’ नावाने तमिळ superstar का ओळखले जातात?

Subscribe

साउथ इंडस्ट्री मध्ये कलाकारांच्या नावासोबत लावल्या जाणाऱ्या टायलला एक वेगळेच वजन आणि भावना आहेत. खासकरुन तमिळ सिनेमान तर कलाकारांना आपल्या नावासह कोणते ना कोणतेतरी टाइटल जरुर मिळालेले आहे. तमिळ मधील प्रेक्षक त्या कलाकारांवर केवळ प्रेमच करत नाहीत तर ते त्यांना देवाचे स्थान ही देतात. रजनीकांत असो किंवा कमल हसन अथवा कोणताही बडा तमिळ कलाकार, सर्वांच्या नावापुढे तुम्हाला एक कोणतेरी टाइटल मिळालेले पहायला मिळेल.

स्टार्स स्वत: सुरुवातीला या टाइटलमुळे कंन्फर्टेबल नव्हते. रजनीकांत यांना आपल्या नावासोबत सुपरस्टार लावण्यासाठी थोडे विचित्र वाटत होते. परंतु काही वर्षानंतर संपूर्ण भारताने त्यांना याच टाइटलने ओळखण्यास सुरुवात केली. या व्यतिरिक्त आपल्या दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनात आपली छाप पाडणारे विजय सेतुपतिला सुद्धा एक टाइटल दिले गेले आहे. त्याचे सुद्धा रजनीकांत यांच्यासारखे होत होते. परंतु दिग्दर्शकांनी असे म्हटले की, या टाइटल्समध्ये एक पॉझिटिव्ह वाइब असते. हे टाइटल तुम्हाला जबाबाऱ्यांबद्दल सांगतात आणि जेव्हा लोक तुम्हाला या नावाने ओळखतात तेव्हा त्यांना योग्य दिशेने विचार करण्यासाठी सुद्धा घेऊन जातात.

- Advertisement -

‘थलाइवा’ असो किंवा ‘थाला’ अथवा ‘थलपति’… तमिळ स्टार्सला मिळालेल्या या टाइटल्समागे एक कथा आहे. एखाद्याला इमोनशल होऊन मिळाले तर एखाद्याला या टाइटलसाठी मार्केटिंग करावी लागली होती.

रजनीकांत

- Advertisement -


रजनीकांत यांनी आपल्या करियरची सुरुवात १९७५ मध्ये सुरुवात केली होती. सिनेमा ‘अपूर्वा रागंगल’ मध्ये त्यांना एक लहान अभिनय मिळाला होता. मात्र दिग्दर्शक एम भास्कर यांनी त्यांना स्क्रिनवर लीड रोलसाठी एक मोठी संधी दिली. भैरवी नावाचा सिनेमा १९७८ मध्ये प्रदर्शित झाला.

रिपोर्ट्स सांगतात की, तमिळ सिनेमाच्या बड्या डिस्ट्रीब्युटर्सपैकी एक के. धनु यांनी चेन्नई सिटी एरियात भैरवी दाखवण्याचे राइट्स खरेदी केले होते. त्यांनी सिनेमाचा गाजावाजा करण्यासाठी चेन्नईतील अन्ना सलाई एरियात प्लाझा थिएटर बाहेर रजनीकांतचे एक ३५ फुट कटआउट लावले. याच थिएटरवर त्यांनी सिनेमाची तीन वेगवेगळी पोस्टर लावली. त्यावर रजनीकांत यांच्या नावासह ‘सुपरस्टार’ असे लिहिले.

कमल हसन


ही गोष्ट फार लोकांना माहिती नसेल की, सुपरस्टार टाइटल केवळ रजनीकांत यांच्यासाठीच वापरले गेले नाही, तर रिपोर्ट्सनुसार १९८१ मध्ये जेव्हा कमल हसन यांनी एक दूजे के लिए प्रदर्शित झाला तेव्हा याच्या एका पोस्टरमध्ये कमल हसन यांना इंडियाचा नंबर १ सुपरस्टार असे म्हटले गेले. परंतु तमिळ सिनेमातील आयकॉनिक अॅक्टर्स मध्ये सुद्धा कमल हसन यांचे टाइटल प्रसिद्ध आहे. त्यांना ‘उलगनायगन’ म्हणजेच युनिवर्सल हिरो असे टाइटल दिले गेले आहे.

यापूर्वी सुद्धा कमल हसन यांना नम्मावार असे टाइटल दिले गेले होते. याचा अर्थ होतो की, आमचा आपला माणूस. कमल यांनी नम्मावार नावाच्या सिनेमात एका शिक्षकाची भुमिका साकारली होती. जो आपल्या विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक कसे बनवावे हे शिकवायचा. कमल यांचा हाच विचार आणि समाजासाठीचा हा दृष्टीकोन पाहता त्यांना या टाइटलने ओळखले जाऊ लागले होते. पण २०१८ मध्ये कमल हसन यांनी जेव्हा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केले तेव्हा आता मी पुन्हा ‘उलगनायगन’ वरुन ‘नम्मावर’ झालो आहे असे म्हटले होते.

अजित कुमार


९० च्या दशकात डेब्यु करणारे अजित कुमार यांचे नेहमीच चाहते होते. २०११ मध्ये आलेल्या दीन सिनेमातून त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती. या सिनेमात त्यांनी प्रत्येक वादावर कसा तोडगा काढला हे दाखवले गेले होते. सिनेमातील एका गाण्यात त्यांच्या भुमिकेसाठी थाला शब्दाचा वापर केला गेला होता. येथूनच जनता त्यांना अजित यांच्या नावासह ‘थाला’ टाइटल वापरुन बोलू लागले.

विजय


जोसफ विजय चंद्रशेखर उर्फ विजयने करियरच्या सुरुवातीला आपले वडील एस.ए. चंद्रशेखर यांच्यासोबत खुप काम केले. डेब्युच्या दोन वर्षानंतर १९९४ मध्ये त्याच्या वडिलांनी त्याला घेऊन रसिगन हा सिनेमा बनवला. तेव्हा त्याच्या नावासह पहिल्यांदाच इलयाथलपति असे टाइटल लावले गेले. म्हणजेच युवा लीडर.

रसिगन विजयचा पहिलाच हिट सिनेमा ठरला आणि त्याच टाइटलने त्याला लोक ओळखू लागली होती. मात्र जेव्हा दिग्दर्शक एटली कुमार यांनी विजय याच्यासोबत मर्सल (२०१७) मध्ये तयार करण्यात आला तेव्हा त्यांच्या टाइटलमधून यंग हटवले पाहिजे. एटलीने पहिल्यांदाच आपल्या सिनेमात ‘थलपति’ टाइटलसोबत इंट्रोड्यूस केले. मर्सल प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चालला. विजय आता ‘इलयाथलपति’ वरुन ‘थलपति’ झाला आहे.

 


हेही वाचा: ‘केजीएफ’ आणि ‘कांतारा’नंतर होंबळे फिल्म्स ने केले ‘धूमम’चा फर्स्ट लुक आऊट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -