घरदेश-विदेशAir India Ukraine Flight : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली एअर...

Air India Ukraine Flight : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली एअर इंडिया

Subscribe

दूतावासाने आता युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना काळजी न करण्याचे आवाहन करत भारतात येण्य़ासाठी विमान तिकीट बुक करण्यास सांगितले आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये अजूनही तणाव कायम आहे. यात दोन्ही देशांमध्ये कोणत्याही परिस्थितीत युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त होतेय. रशियाकडून वारंवार सैन्य माघार घेतल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. यामुळे कोणतीही चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याआधी भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगीकरण झालेल्या एअर इंडियाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे एअर इंडियाच्या विमानातून आता युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक मायदेशात परतणार आहेत. यासंदर्भातील माहिती एअर इंडियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.

युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम बोरिस्पिल इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणण्यात येणार असून यासाठी एअर इंडियाने तीन विमान उड्डाणासाठी तयार ठेवली आहेत. 22, 24 आणि 26 फेब्रुवारीला ही विमान युक्रेनला पोहचणार असून त्याचदिवशी ती विद्यार्थ्यांना घेऊन मायदेशी परतणार आहेत. या विमान प्रवासासाठी एअर इंडियाचे कार्यालये, वेबसाईट आणि कॉल सेंटर, अधिकृत एजंटकडे तिकीट बुक करण्याचे आवाहन एअर इंडियाने केले आहे. यातच नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने भारत आणि युक्रेनदरम्यानची विमान उड्डाण बंदी उठवली आहे. तसेच सीटवरील निर्बंधही हटवले आहे. याचशिवाय देशातील विमान कंपन्यांना युक्रेन भारतदरम्यानच्या विमान सेवा सुरु करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे एअर इंडिया आता युक्रेनसाठी तीन विमानं पाठवणार आहे.

- Advertisement -

एअर इंडियाचे खासगीकरण झाले असले तरी त्यांच्याकडे रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव असलेले अनेक जुने कर्मचारी आहेत. जर अशीच काही कठीण परिस्थिती उद्भवली तर त्याचा फायदा एअर इंडिया कंपनीला होणार आहे.

- Advertisement -

युक्रेनमध्ये वाढती तणावाची परिस्थिती पाहता अनेक भारतीय नागरिकांना मायदेशी परत यायचे आहे, यावर युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, युक्रेनमधील भारतीयांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी भविष्यात आणखी काही विमानांची व्यवस्था करण्याची योजना आखली आहे. यात अनेक भारतीयांनी युक्रेनमधून भारतात येण्यासाठी विमाने उपलब्ध नसल्याची तक्रारी केल्या आहेत. मात्र दूतावासाने आता युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना काळजी न करण्याचे आवाहन करत भारतात येण्य़ासाठी विमान तिकीट बुक करण्यास सांगितले आहे.


Russia Ukraine Crisis : रशियाच्या इशाऱ्यानंतर बंडखोरांनी गावात केला गोळीबार; युक्रेनचा दावा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -