घरदेश-विदेशHijab Row : कर्नाटक हिजाब वादात आता 'अल-कायदा'ची एन्ट्री; मुस्कान खानचे केले...

Hijab Row : कर्नाटक हिजाब वादात आता ‘अल-कायदा’ची एन्ट्री; मुस्कान खानचे केले कौतुक

Subscribe

अल् कायदाचा नेता अयमान अल जवाहिरीने कर्नाटकातील हिजाब वादावर गरळ ओकत त्याने भारतीय मुस्लिमांना याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे.

कर्नाटक हिजाब बंदी प्रकरणावरून देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अद्यापही या वादावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. अशात आता अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने हिजाब वादावर भारताविरोधात गरळ ओकली आहे. जवाहिरीने 9 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात ‘जय श्री राम’ असा नारा देणाऱ्या जमावाविरोधात ‘अल्लाहू अकबर’ असा नारा देणाऱ्या मुस्कान खान या विद्यार्थिचीने त्याने कौतुक केलेय. कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई केल्यानंतर मुस्कान खानने ‘जय श्री राम’ अशा नारा देणाऱ्या जमावासमोर ‘अल्लाहू अकबर’ अशी एकटीने नारीबाजी केली. यामुळे अयमान जवाहिरीने मुस्कानची स्तुती करताना कविताही वाचली. तसेच हिजाब बंदी हा त्रासदायक निर्णय असल्याचे वर्णन करून त्याने भारतीय मुस्लिमांना या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

जवाहिरीचा व्हिडिओ अल-कायदा या अधिकृत शबाब मीडियाने जारी असून त्याची SITE इंटेलिजन्स ग्रुपने याची पुष्टी केली. ओसामा बिन लादेननंतर अल कायदाचा नेता बनलेल्या जवाहिरीने कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थी मुस्कान खानचे कौतुक केले. या व्हिडिओचे टायटल आणि पोस्टर असे लिहिले आहे – नोबल वुमन ऑफ इंडिया.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये जवाहिरीने सांगितले की, ‘मला व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्कानबद्दल माहिती मिळाली आणि या बहिणीने तकबीरचा आवाज वाढवून माझे मन जिंकले. म्हणूनच मी तिच्या स्तुतीतील कविता वाचतोय. कविता वाचल्यानंतर जवाहिरीने हिजाबवर बंदी घालणाऱ्या पाकिस्तान आणि बांगलादेशसह देशांवर हल्ला चढवला. या देशांना पाश्चात्य देशांचे सहयोगी म्हणून त्याने लक्ष्य केले.

नोव्हेंबरनंतर जवाहिरीचा हा पहिला व्हिडिओ आहे. हिजाबच्या वादाची तिला जाणीव असल्याचे जवाहिरीने व्हिडिओमधून स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारी महिन्यात कर्नाटकात हिजाबचा वाद सुरू झाला. उडुपी येथील एका सरकारी शाळेत काही विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर देशातील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. हिजाबला विरोध करत काही विद्यार्थी भगवी शाल परिधान करून मंड्यातील पीईएस कॉलेजमध्ये आले.

- Advertisement -

नंतर हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीनंतर हायकोर्टाने निर्णय दिला की हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही आणि त्यामुळे राज्य सरकारला शाळांमध्ये गणवेशाचा भाग बनवण्याचा आदेश देता येणार नाही.

2011 मध्ये लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा ही दहशतवादी संघटना सांभळणारा अयमान अल जवाहिरी हा दुसरा नेता आहे. जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या लिस्टमधील अल जवाहिरी याचा 2020 मध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र या नव्या व्हिडीओमुळे तो जिवंत असल्याचे समोर आले आहे.


सावधान! Kinder Joy खाल्ल्याने मुलं पडताहेत आजारी, पसरतोय ‘हा’ रोग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -