घरदेश-विदेशअनवर उल हक हे पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान

अनवर उल हक हे पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान

Subscribe

इस्लामाबाद : अनवर उल हक यांनी पाकिस्तानचे नवे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात आज अनवर उल हक यांच्या शपथविधी सोहळा पार पडला. पाकिस्तानचा पंतप्रधान होण्यापूर्वी अनवरल उल हकने त्यांच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह सिनेटच्या सदसत्वाचा राजीनामा दिला. यानंतर अनवर उल हक हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान झाले.

अनवर उल हक यांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी इस्लामाबादच्या राष्ट्रपती भवनमध्ये पंतप्रधान पदाची शपथ दिली. यानंतर अनवर उल हक हे पाकिस्तानचे 8वे पंतप्रधान झाले. पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वी अनवर उल हक यांनी पाकिस्तानच्या सिनेट सभागृहाच्या सिनेट सदस्यत्वाचा राजीनामा सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी यांच्याकडे सोपविला आणि त्यांनी त्यांचा स्वीकार देखील केला. त्याचबरोबर अनवर उल हक यांनी एक दिवस आधी बलुचिस्तान अवामी पार्टीचा देखील राजीनामा दिला.

- Advertisement -

माजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याची शिफारस केली होती. यानंतर शरीफ यांच्याविरोधात विरोधकांचे नेता राजा रियाज अहमद यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर अनवर उल हकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

हेही वाचा – Imran Khan : पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून अल्टिमेटम; पाकिस्तानच्या कागदपत्रातून खुलासा

- Advertisement -

90 दिवसांच्या आत पाकिस्तानमध्ये निवडणूक

अनवर उल हक यांना पाकिस्तानाच काळजीवाहू पंतप्रधान पदी विराजमान झाले आहेत. यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच पाकिस्तान पीपल्स पार्टीने 90 दिवसाच्या आत निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -