घरमुंबईNawab Malik : राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Nawab Malik : राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Subscribe

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (supreme court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना किडनीच्या उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कुर्ल्याच्या क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. अशातच नवाब मलिक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रुग्णालयाबाहेर उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांना नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार असा प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी इथे माझ्या मोठ्या भावाला भेटायला आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे. (Nawab Malik Which faction of NCP will you go with Supriya Sule said)

हेही वाचा – हुकूमशाहीचं सरकार आम्हाला पळवून लावायचंय; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला निशाणा

- Advertisement -

अजित पवार यांनी राष्ट्रवदीच्य काँग्रेसच्या 8 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पक्षात दोन गट पडले असून जामीन मिळाल्यानंतर नवाब कोणत्या गटासोबत जाणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी कार्यकर्त्यांनी बोलावल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि मोठे बंधू कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. अशातच सुप्रिया सुळे यांना नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्या म्हणाल्या की, याची मला काहीच माहिती नाही. कारण मी याठिकाणी पक्ष किंवा राजकारणी म्हणून नाही तर, माझ्या मोठ्या भावाला भेटायला आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे. त्यामुळे मी याठिकाणी त्याला भेटायला आले आहे, असे त्या म्हणाल्या.

शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून सत्य बाहेर येतं

नवाब मलिक यांच्या जामीनावर बोलरताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पहिल्या दिवसांपासून माझं स्वत:च मत की, नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना ज्या पद्धतीने अटक झाली, त्यांच्यावर केसेस झाल्या हे अतिशय दुर्देवी आहे. शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून आज न्याय मिळालेला आहे. नवाब मलिक बाहेर येत आहेत. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनात समाधान आहे. काही कारणांमुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि त्यांना जे काही सहन करावे लागले. परंतु शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून सत्य बाहेर येतं, सत्यमेव जयते. आज ते बाहेर येत आहेत, आम्ही समाधानी आहोत. नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांच्या कुटुंबासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संपूर्ण काळ अडचणीचा होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवार थेटच बोलले; काय म्हणाले वाचा-

नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडून कुर्ल्यात शक्तिप्रदर्शन

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिका यांना जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिका यांना दीड वर्षांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर ते तुरंगात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरू झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला जामीन मिळावा यासाठी त्यांचे न्यायालयात प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. शनिवारी आणि रविवारी न्यायालय बंद असल्याने आज मलिक यांची सुटका होणार आहे. त्यामुळे सकाळपासून त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यानी कुर्ल्यातील रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -