घरदेश-विदेशसंयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; 'या' कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

संयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; ‘या’ कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव

Subscribe

संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगातील प्रमुख नेते सहभागी झाले आहेत

नवी दिल्ली : सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅनडाशी आपले संबंध ताणल्या गेले आहेत. असे जरी असले तरी दुसरीकडे मात्र, संयुक्त राष्ट्राने भारताचे कौतुक केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्या कौतुकाचे कारणही समोर आले आहे.
कोरोना महामारीच्या काळात जेव्हा जगातील सर्व देश आपापल्या लोकांना वाचवण्यात व्यस्त होते, तेव्हा भारत सरकारने स्वतःच्या लोकांच्या तसेच जगातील लोकांच्या कल्याणाचा विचार केला. याच विचारातून भारताने जगातील अनेक देशांना कोरोनाची लस दिली होती. भारताच्या त्या औदार्याने जगातील अनेक देशांचे लक्ष वेधून घेतले होते. अशाच एका देशाने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून भारताचे आभार मानले आहेत. (Appreciation of India by United Nations Due to this reason there is rain of good wishes)

संयुक्त राष्ट्र महासभेचे आयोजन अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगातील प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. डॉमिनिकाचे परराष्ट्र मंत्री डॉ. विन्स हेंडरसन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून भारताचे कौतुक केले. डॉ. विन्स हेंडरसन म्हणाले की, कोरोना महामारीदरम्यान आम्ही शिकलेल्या धड्यांमुळे मला खूप प्रेरणा मिळाली. या महत्त्वाच्या व्यासपीठावरून मला हे सांगायचे आहे की, मला आठवते की, कोरोना महामारीच्या काळात आपण कोरोनाची लस कशी मिळवू शकतो आणि आपल्या लोकांना कसे वाचवू शकतो याचा विचार करत होतो. विशेषत: आपल्यासारख्या छोट्या देशात, जो पर्यटनावर अवलंबून आहे, आपल्याला आपल्या लोकांचे संरक्षण करणे आवश्यक होते. आम्ही याचा विचार करत असतानाच भारताने आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आम्हाला लस दिली असे गौरोद्गार त्यांनी यावेळी भारताविषयी काढले.

- Advertisement -

गरजेच्या वेळी केली भारताने मदत

पुढे बोलताना डॉमिनिकाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जेव्हा आम्हाला लस मिळाली, तेव्हा आम्ही त्या इतर कॅरिबियन देशांना उपलब्ध करून दिल्या. म्हणूनच, या महत्त्वाच्या व्यासपीठावरून आणि विशेषत: वैयक्तिकरित्या, आम्हाला गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल भारतातील लोक आणि तेथील सरकारचे मनापासून आभार मानायचे आहेत.

- Advertisement -

जगातील 98 देशांना लसीचा पुरवठा

कोरोना महामारीच्या काळात भारताने वसुधैव कुटुंबकम या मंत्राचे पालन करत जगातील 98 देशांना कोरोनाची लस दिली. भारताच्या या लस मैत्रीचे जगभर कौतुक झाले. विशेष बाब म्हणजे भारताने अनेक गरीब देशांना वेळेवर लस पोहोचवून मानवतेचे एक नवे उदाहरण ठेवले होते हे विशेष.

हेही वाचा : गढूळ झालेल्या राजकीय परिस्थितीवर साहित्यीकांनी बोललं पाहिजे; राज ठाकरेंचं मत

या देशांनीही केले भारताचे कौतुक

भारत-यूएन परिषदेदरम्यान, भूतानचे परराष्ट्र मंत्री तांडी दोरजी म्हणाले की, लस ​​मैत्री हा भारताच्या सर्वात मोठ्या मानवतावादी उपक्रमांपैकी एक आहे. लस मैत्री अंतर्गत, भारताने जगातील 100 हून अधिक देशांना कोरोनाची लस दिली आहे. भारत आणि भूतानमधील भागीदारी हे जागतिक दक्षिणेतील मजबूत द्विपक्षीय संबंधांचे उदाहरण आहे. यासोबतच मॉरिशसचे अन्न सुरक्षा मंत्री मनीष गोबिन यांनी परिषदेदरम्यान सांगितले की, 1990 मध्ये भारत ही बंद अर्थव्यवस्था होती आणि आता भारत कुठे पोहोचला आहे ते पहा. पण भारत इतर देशांना विसरलेला नाही. इतरांना बाय-बाय म्हणणारा हा देश नाही. असे ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : ‘महात्मां’च्या जयंतीला मोदी सरकार देणार ‘स्वच्छांजली’; देशभर एक तास राबवली जाणार स्वच्छता मोहीम

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठा दावा

मालदीवचे परराष्ट्र मंत्री अहमद खलील म्हणाले यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारत पुढील 25 वर्षांत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. भारताच्या वचनबद्धतेचे जगाने कौतुक केले. कोरोना महामारीतून लवकर बाहेर निघण्याच्या प्रयत्नात भारताचे योगदान मोठे आहे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -