घरदेश-विदेशभारतात विलिनीकरणाचा आमचा निर्णय चुकीचा होता का?

भारतात विलिनीकरणाचा आमचा निर्णय चुकीचा होता का?

Subscribe

आज राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. हा निर्णय केंद्र सरकारचा ऐतिहासिक असल्याचे म्हटलं जातं आहे. या निर्णयाविरोधात राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. या सर्व निर्णयाबाबत टि्वटरवर कौतुका आणि टीकांचा वर्षाव होत आहे.

काश्मीरची माजी मुख्यमंत्री- मेहबुबा मुफ्ती

‘आज भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. १९४७ साली भारतात विलिनीकरणाचा निर्णय हा आमच्या अंगलट आला आहे. मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरमधून ३७० हद्दपार करण्याचा निर्णय हा असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे. या भारत सरकारच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जम्मू-काश्मीरातील नागरिकांनी दहशतीखाली ठेवायचं आहे. हा भारत सरकारचा स्पष्ट असा हेतू आहे. भारत सरकारने काश्मीरी जनतेला दिलेली आश्वासनं पाळण्यात पूर्ण अपयशी ठरलं आहे.’

- Advertisement -

जेडी यू नेते – केसी त्यागी

केसी त्यागी जेडी यू यांनी जम्मू काश्मीरच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगताना असे सांगितलं आहे की, ‘आम्ही आमचे प्रमुख नितीश कुमार, जेपी नारायण, राम मनोहर लोहिया आणि जॉर्ज फर्नांडिस यांची परंपरा पुढे आणत आहे. त्यामुळे आमचा पक्ष राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या निर्णयाला पाठिंबा देत नाही. आमची विचारसरणी वेगळी आहे. कलम ३७० रद्द करू नये, असे आम्हाला वाटतं’

- Advertisement -

 युवासेनाप्रमुख – आदित्य ठाकरे

देशासाठी आज ऐतिहासिक निर्णयाचा दिवस आहे. कलम ३७० रद्द करून खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचा भाग बनला आहे. देशाच्या जनतेनं सुरक्षित प्रगतीशील आणि खुल्या जम्मू-काश्मीरचा निर्णय घेतला आहे. फुटिरतावाद्यांचे धाबे आता दणाणले आहेत.

कवी – कुमार विश्वास 

‘आज पुरा देश पूरे लाम पर है, जो जहाँ पर है वतन के काम पर है | आपली आजच्या ऐतिहासिक दिवशी शांततापूर्ण वातावरण टिकवण्याची जबाबदारी आहे. सतर्क राहा अतिउत्साही पणा सार्वजनिक ठिकाणी दाखवू नका.’

माजी अर्थमंत्री – अरूण जेटली

‘भारत सरकारचा कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा देशाच्या एकीकरणाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. आज ऐतिहासिक निर्णय झाला आहे. कलम ३५अ छुप्या पद्धतीनं राज्यघटनेत आलं, ते जाणारचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना ऐतिहासिक चूक बदलल्यानं खूप खूप शुभेच्छा..’

काँग्रेस नेते – गुलाम नबी आझाद

‘भारतीय राज्यघटनेवर आमच्या पूर्ण विश्वास आहे. राज्यघटनेची सुरक्षा करण्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू, पण आज भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -