घरमुंबईशेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात मोठी घसरण

Subscribe

काश्मीरमधील घडामोडींच्या सावटाखाली आज सकाळी शेअर बाजार उघडताच शेअर बाजार २७६ अंशांच्या घसरणीत सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

जम्मू काश्मीर आणि दिल्लीतील वेगवान घडामोडींमुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. काश्मीरमधील हालचालींमुळे शेअर बाजार उघडतास त्यात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजार ६५० अंशांनी घसरला. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत ५५७ अंशांनी गडगडला होता. त्यामुळे निर्देशांक ३६, ५६२. २१ अंशांवर खाली आला आहे.

२७६ अंशांच्या घसरणीत शेअर बाजार सुरु

काश्मीरमधील घडामोडींच्या सावटाखालीच आज सकाळी शेअर बाजार उघडला. शेअर बाजार २७६ अंशांच्या घसरणीत सुरु झाला असून सध्या ही घसरण सुरुच असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून याचा फटका शेअर बाजारला बसला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. वाहन उद्योगातील मंदी आणि अमेरिका चीनमधील व्यापार युद्धाच्या विपरित परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. तर आज पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावरुन शेअर बाजार पुन्हा घसरला आहे. तर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी यांचे शेअरर्स नफ्यात होते. तर निफ्टीही आयटी कंपन्यांचे शेअर्स देखील नफ्यात दिसून आले आहेत.


हेही वाचा – कलम ३७० म्हणजे काय? ३७० रद्द केल्याने काय होणार?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -