घरदेश-विदेशArvind Kejriwal ED Summon: ईडीच्या समन्सवर केजरीवाल थेटच बोलले; निवडणुकीपूर्वी मला...

Arvind Kejriwal ED Summon: ईडीच्या समन्सवर केजरीवाल थेटच बोलले; निवडणुकीपूर्वी मला…

Subscribe

कथित मद्य घोटाळ्यात घेरलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौथ्या समन्सकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करून चौकशीसाठी जाण्यास होण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून उत्तर पाठवले आहे.

नवी दिल्ली : ईडीने मला चौथी नोटीस पाठवली आहे. या सर्व नोटीस बेकायदेशीर आणि अवैध आहेत. राजकीय कटाचा भाग म्हणून या नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही चौकशी 2 वर्षांपासून सुरू आहे. त्यांना काहीच सापडले नाही. लोकसभा निवडणुकीच्या 2 महिन्या आधी ते अचानक मला नोटीस का पाठवत आहेत? भाजप ईडी चालवत आहे. हे सर्व करून केजरीवाल यांना प्रचार करण्यापासून रोखणे हा त्यांचा उद्देश आहे. तर निवडणुकीपूर्वी मला अटक करणं हाच एकच उद्देश ईडीचा असल्याचेही ते म्हणाले. (Arvind Kejriwal ED Summons Kejriwal speaks directly on ED summons Before the election I)

कथित मद्य घोटाळ्यात घेरलेले आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौथ्या समन्सकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करून चौकशीसाठी जाण्यास होण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात केजरीवाल यांनी ईडीला पत्र लिहून उत्तर पाठवले आहे. गुरुवारी याबाबत माहिती देताना आपने सांगितले की, केजरीवाल यांनी ईडीला पाठवलेल्या उत्तरात त्यांनी असेही विचारले आहे की, केजरीवाल हे आरोपी नसल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात लिहिले आहे, तर मग त्यांना समन्स का पाठवतायत? आणि त्यांच्या अटकेची तयारी का करतंय? असा प्रश्न आपनं विचारला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले होते आणि गुरुवारी त्यांना ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. केजरीवाल आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करू नयेत म्हणून त्यांना अटक व्हावी, अशी भाजपची इच्छा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

- Advertisement -

केजरीवाल यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी हे केले जात आहे, असे ‘आप’ने म्हटले आहे. केजरीवाल हे आरोपी नाहीत, मग त्यांना समन्स का बजावण्यात आले, असे आपने म्हटले आहे. आपचे नेते भ्रष्टाचारात गुंतलेले नाहीत आणि भाजपमध्ये कधीही सामील होणार नाहीत, असेही आपने म्हटले आहे. मात्र, याबाबत कायदेशीर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Ram Mandir : संकेश्वर व करवीर पीठाच्या शंकराचार्यांसह राज्यातील प्रमुख साधू-महंत अयोध्येकडे रवाना

- Advertisement -

केजरीवाल गोवा दौऱ्यावर

अरविंद केजरीवाल आज गुरुवारी (18 जानेवारी) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गोवा दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात केजरीवाल 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी गोव्यात मुक्कामी असणार आहेत. तिथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. यासोबतच अरविंद केजरीवाल गोव्यात एका जाहीर सभेलाही संबोधित करु शकतात.

हेही वाचा : MP Crime News: नोकरीसाठी ‘वन नाइट स्टॅंड’ची अट; पोलिसांनी ‘त्या’ची धिंड काढत दाखवले तारे

केजरीवाल घाबरलेत, भाजपकडून हल्लाबोल

ईडीने बजावलेल्या समन्सला टाळत केजरीवाल गोवा दौऱ्यावर असताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ईडीने केजरीवाल यांना चौथी नोटीस पाठविली. ईडीला त्याची चौकशी करायची आहे. पण केजरीवाल घाबरले आहेत. त्यांना माहित आहे की ते आरोपी तुरुंगात जाणार आहेत. अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -