घरमहाराष्ट्रMano Jarange Patil : राज्यातील 54 लाख कुणबींना मिळणार प्रमाणपत्र; अंमलबजावणी कधी...

Mano Jarange Patil : राज्यातील 54 लाख कुणबींना मिळणार प्रमाणपत्र; अंमलबजावणी कधी होणार?

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलानासाठी मुंबईला येण्यास आग्रही आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून आंदोलक जरांगे पाटील आणि मराठा बांधव 20 जानेवारीपासून मुंबईकडे मार्गक्रम करणार आहेत. मुंबई होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिंदे समितीला आतापर्यंत सापडलेल्या 54 लाख नोंदींना तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होणार का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. (Mano Jarange Patil 54 lakh Kunbis in the state will get certificate When will it be implemented Maratha Reservation)

हेही वाचा – Maharashtra Politics : उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम

- Advertisement -

बीडच्या इशारा सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मराठे 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटीतून निघणार आणि 26 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मनोज जरांगे पाटील पुढील दोन दिवसात मुंबईकडे रवाना होणार आहेत. अशातच राज्यात शिंदे समितीला सापडलेल्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत जेवढ्या नोंदी सापडल्या अशांना तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाच्या मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांनी यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता मराठा आरक्षणासंदर्भात ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे.

अंमलबजावणी होणार का? जरांगेंचा सवाल

54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश आल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या आदेशाची अंमलबजावणी होणार का? असा सवाल करत ते म्हणाले की, आतापर्यंत खूप आदेश आले आहेत. आम्हाला 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दिले पाहिजे. असे आदेश काढून त्याची अंमलबजावणी होणार असेल तर बघावं लागेल, असे मनोज जरांगे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Crime : प्रेयसीची हत्या करत स्वत:ला संपवले, मात्र पोलीस अडकले सांकेतिक क्रमांकात

आरक्षण मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार

राज्य सरकारवर निशाणा साधताना मनोज जरांगे म्हणाले की, नुसता आदेश काढून चार दोन लोकांना वाटलेलं आम्हाला मान्य नाही. कारण आता मराठा  फसणार नाही. वेळेप्रसंगी सरकारने माझा जीव घेतला तरी मी तयार आहे. कारण मागील दोन महिन्यात त्यांनी काही केले नाही, ही त्यांची चूक आहे. विशेषबाब करून 20 जानेवारीच्या आत त्यांनी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे. त्यांची गाव पातळीवर यंत्रणा आहे. आज 18 तारीख आहे, त्यामुळे अर्ज भरून घ्यावेत, गावागावात तलाठी, ग्रामसेवक आहेत. उद्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करा आणि प्रमाणपत्र वाटप केल्याचा तो डाटा आम्हाला द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या म्हणतात, पण ते कोणत्याच मराठ्याला माहिती नाही. त्यामुळे आरक्षण मिळालं तरी आम्ही मुंबईला जाणार, नाही मिळालं तरी मुंबईला जाणार आणि आरक्षण मिळाल्यावर गुलाल टाकायला मुंबईला जाणार, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -